सॅन फ्रान्सिस्को -फेसबुकने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युझर्सना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी नव्या इमोजी लॉन्च केल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या भीतीने सर्वजण एकमेकांना काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सोशल मिडियाचा वापरही वाढला आहे. त्यामुळे फेसबुकवरून आपल्या मित्रांशी नातेवाईकांशी संपर्कात राहताना या नव्या इमोजी वापरता येणार आहेत.
कोरोना संकटात फेसबुकवर व्यक्त होण्यासाठी आता 'केअरिंग इमोजी' - फेसबुक अॅड इमोजी
नव्या इमोजी फेसबुकमध्ये अॅड केल्याचे कंपनीने ट्विटरवरून जाहीर केले आहे.
नव्या इमोजी फेसबुकमध्ये अॅड केल्याचे कंपनीने ट्विटरवरून जाहीर केले आहे. याआधी कंपनीने २०१५ साली केअर इमोजी अॅड केल्या होत्या. फोटो, व्हिडीओ, स्टेटसवर कमेंटद्वारे व्यक्त होताना किंवा संदेश पाठवताना या नव्या केअरींग इमोजी युझर्सला पाठवता येणार असल्याचे फेसबुक अॅपचे प्रमुख फिदजी सिमोन यांनी सांगितले.
कोरोना संकटाचा सामना करताना नागरिकांना व्यक्त होण्यासाठी या नव्या इमोजींचा समावेश अॅपमध्ये करण्यात आला आहे. सोशल मिडियावर व्यक्त होतोना मोठ्या प्रमाणात इमोजींचा वापर करण्यात येतो. यातील काही इमोजी लोकप्रिय आहेत. त्यामध्ये नव्याने आता केअर इमोजींचा समावेश झाला आहे.