बंगळुरु -कर्नाटकचे भाजप अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुराप्पा यांनी काँग्रेस-जेडीएस आघाडीने बहुमत गमावल्याचा दावा केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामींना विश्वासदर्शक ठराव सिद्ध करून दाखवा अथवा, राजीनामा द्या असे आव्हान दिले आहे.
कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव सिद्ध करून दाखवावा अथवा, राजीनामा द्यावा - येदियुराप्पा
काँग्रेस आमदार नागराज यांनी राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
'मी कुमारस्वामींना तातडीने राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण १५ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. तसेच, २ अपक्ष आमदारांनी राज्यपालांना भेटून मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत. त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. आता कुमारस्वामींकडे बहुमत नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा,' असे येदियुराप्पा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेस आमदार नागराज यांनी राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.