महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पुलवामा हल्ल्यामुळे प्रचंड वेदना, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी व्यक्त केल्या भावना - mukhrjee

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४५ जवानांना वीरमरण आले.

delhi

By

Published : Feb 16, 2019, 11:45 AM IST

नवी दिल्ली - पुलवामा येथे झालेला हल्ला हा दहशतवाद्यांचा अमानवीयपणा आहे. या हल्ल्यामुळे आपल्याला प्रचंड वेदना होत आहेत, अशा शब्दात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपले दुःख व्यक्त केले. या प्रसंगी सर्वांनी देश म्हणून एकत्र येण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

राजकीय पक्ष, सर्व राजकारणी यांनी आता संयुक्त आघाडी उघडली पाहिजे. या प्रसंगाला एकत्रीत उत्तर देणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याचा निषेध केल्याने भारताला बळ मिळेल, असेही ते म्हणाले.

या हल्ल्यातून आम्ही धडा घ्यायला हवा. आमची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याकडे पावले उचलली गेली पाहिजेत. आंतरराष्ट्रीय पतळीवर मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे भारत या प्रसंगाला सशक्तपणे तोंड देऊ शकेल, असे मुखर्जी म्हणाले.

जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला होता. सीआरपीएफचे जवळपास अडीच हजार जवान ७८ बसेसमधून प्रवास करत होते. हे जवान हल्लात बळी पडले. यात ४५ जवानांना विरमरण आले आहे. पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details