नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जवळ जवळ ८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वच खंडांमध्ये कोरोनाचा विषाणू पसरला असून 130 देशांमध्ये रुग्ण आढळून आले असून दिवसेंदिवस त्यांच्या संख्या वाढत आहे. भारतामध्ये १३७ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतातील कोरोना रुग्णांची अद्ययावत यादी जाहीर केली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत १४७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण झाले आहे. १२२ भारतीय नागरिकांचा तर २५ परदेशी नागरिकांचा यामध्ये समावेश आहे.
राष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची दिल्ली विमानतळाला भेट
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज (बुधवारी) रात्री दिल्ली विमानतळावरील आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. देशामध्ये कोरोनाच्या शिराकावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना घाबरून जावू नका मात्र काळजी घ्या, असे आवाहन केले होते. त्यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनीही विदेशातील भारतीय प्रवाशांना सर्वोतपरी मदत केली जाईल, असे सांगितले होते. जयशंकर यांनी विमानतळ अथॉरिटीला भेट देऊन चौकशी केली.