नवी दिल्ली - उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने निकाल दिला आहे. माजी भाजप आमदार कुलदीप सिंह सेनगरसह ७ जणांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यामध्ये कुलदीप सेनगरचा भाऊ अतुल सेनगर याचाही समावेश आहे. तसेच पीडितेला कुलदीप आणि अतुल सेनगर या दोघांनी प्रत्येकी १० लाख देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
उन्नाव प्रकरण: पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी सेनगरसह ७ जणांना दहा वर्षांचा तुरुंगवास
उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने निकाल दिला आहे. माजी भाजप आमदार कुलदीप सिंह सेनगरसह ७ जणांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
पीडितेच्या वडिलांचा ९ एप्रिल २०१८ साली तुरुंगात असताना मृत्यू झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने सेनगरसह ७ जण दोषी असल्याचा निर्णय दिला होता. आज यावर निर्णय देण्यात आला.
४ जून २०१७ ला पीडितेने सेनगरवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर कुलदीप सेनगरचा भाऊ अतुल सिंह आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पीडितेच्या वडिलांना जबर मारहाण केली होती. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. बलात्कार प्रकणार कुलदीप सेनगरला याआधीच जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तसेच १० लाख रुपये पीडितेला देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.