श्रीनगर- जम्मू काश्मीरच्या दक्षिण भागातील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्या चकमक सुरू झाली आहे. या घटनेत अजून कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
जम्मू काश्मीरच्या पुलवाम्यात सुरक्षा दल, दहशतवाद्यांत चकमक - anantnag
दोन दिवसांपूर्वी अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यात सुरक्षा दलाच्या ५ जवानांना वीरमरण आले होते. त्यामुळे सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
जम्मू काश्मीर
पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा शहराजवळील ब्राव बांदिना गावात लष्कराने शोधमोहीम सुरू केली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसराला सर्व बाजूंनी वेढले आहे. दहशवादी आणि जवान यांच्यात गोळीबार सुरू आहे. या घटनेत अजूनपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
दोन दिवसांपूर्वी अनंतनाग येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाच्या ५ जवानांना वीरमरण आले होते. त्यामुळे सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे.