श्रीनगर -जम्मू-काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. बडगाम जिल्ह्यात क्रालपोरा परिसरात लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान एका दहशतवाद्यात खात्मा करण्यात सुरक्षादलाला यश आले आहे. सुरक्षादलांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
जम्मू काश्मीर : क्रालपोरा भागात दहशतवाद्यांसोबत जवानांची चकमक; एकाचा खात्मा - Kralpora area
बडगाम जिल्ह्यात क्रालपोरा परिसरात लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
सुरक्षा दल
जम्मू काश्मीर खोऱ्यातील क्रालपोरा परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणेत शुक्रवारी सकाळपासूनच जोरदार चकमक सुरू आहे. सुरक्षादलाला क्रालपोरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. आज सकाळी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर या चकमकीला सुरुवात झाली आहे. सुरक्षा रक्षक या गोळीबाराला चोख प्रतिउत्तर देत आहेत.
Last Updated : Jun 28, 2019, 11:45 AM IST