महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सत्ताधारी पक्षातील १००-२०० जणांशिवाय काश्मीरमध्ये कोणीही आनंदी नाही - गुलाम नबी आझाद - काश्मीर परिस्थिती

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद हे नुकतेच काश्मीरची भेट घेऊन परतले आहेत. प्रशासनाची एवढी दहशत मी कोणत्याच देशामध्ये पाहिली नाही. काश्मीरमध्ये लोकशाही नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहिली नाही, असे आझाद म्हटले.

गुलाम नबी आझाद

By

Published : Sep 25, 2019, 5:41 PM IST

श्रीनगर- काश्मीरमधील जनता सध्या संकटात आणि निराशेत आहे. अगदी तशीच परिस्थिती जम्मूमध्ये देखील आहे. सत्ताधारी पक्षातील १००-२०० लोक सोडले, तर काश्मीरमध्ये कोणीही आनंदी नाही, असे मत जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद हे नुकतेच काश्मीरची भेट घेऊन परतले आहेत. प्रशासनाची एवढी दहशत मी कोणत्याच देशामध्ये पाहिलीनाही. काश्मीरमध्ये लोकशाही नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहिलीनाही, असे देखील आझाद म्हटले. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये अनागोंदी माजली होती. तिथली मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. आता काही ठिकाणी या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, तर तिथले जनजीवन पूर्वपदावर आल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र, स्थानिक पत्रकार आणि विरोधी पक्षनेत्यांच्या मुलाखतींमधून वेगळीच परिस्थिती समोर येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details