भुवनेश्वर - माजी केंद्रीय खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांना सोमवारी नवी दिल्लीतील विशेष केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयाने तीन वर्षं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, निकालाच्या काही वेळानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
कोळसा घोटाळा : माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांना जामीन मंजूर - सीबीआय
माजी केंद्रीय खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांना कोळसा घोटाळ्याप्रकरणी 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
1999च्या झारखंड कोळसा घोटाळ्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांना तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. दिलीप यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल होते. तथापि, आता दिलीप रे यांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. या प्रकरणात रे यांच्याव्यतिरिक्त इतर दोन अधिकाऱ्यांनाही जामीन मंजूर झाला आहे.
दिलीप रे हे बिजू जनता दलाचे संस्थापक सदस्य आहेत. बिजू पटनायक यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जात. मात्र, त्यांनी पक्षांतर करत ,भाजपामध्ये दाखल झाले. भाजपाच्या तिकिटावर त्यांनी राऊरकेला येथून 2014ला निवडणूक लढवली होती. तर 2019 निवडणुकीपूर्वीच ते भाजपातून बाहेर पडले होते.