नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (PTI) चे माजी आमदार बलदेव कुमार सिंग पाकिस्तान सोडून भारतात आले आहेत. त्यांना भारताकडे शरण देण्याची मागणी केली आहे. 'पाकिस्तानात केवळ अल्पसंख्य हिंदूंवरच नव्हे; तर, मुस्लिमांवरही अत्याचार होत आहेत,' असे ते म्हणाले.
हेही वाचा - शेहला रशीदला न्यायालयाचा दिलासा, देशद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी सध्या अटक नाही
मीडियाशी बोलताना बलदेव यांनी पाकमध्ये अल्पसंख्याक असोत किंवा बहुसंख्याक असलेले मुस्लीम सर्वांवरच अत्याचार होत असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी पाकिस्तानात राहत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी भारताकडे शरणागतीची मागणी केली आहे.
बलदेव कुमार सिंग पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बारीकोट या आरक्षित जागेवरून निवडून आले होते. सध्या ते भारतात आहेत.
हेही वाचा - पश्चिम बंगालमधील ६१ बालकामगारांची चेन्नईमधून सुटका