महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीमध्ये सुधार नाही, अद्यापही व्हेंटिलेटरवरच - प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटर

"सध्या त्यांच्या हृदयाची गती नियमित आहे आणि ते व्हेंटिलेटरवर आहेत" असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मंगळवारी रात्रीपर्यंत त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले होते. त्यानंतरही त्यांच्या तब्येतीत विशेष असा सुधार झाला नसल्यामुळे त्यांना अजूनही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

Ex-Prez Pranab Mukherjee remains critical
प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीमध्ये सुधार नाही, अद्यापही व्हेंटिलेटरवरच

By

Published : Aug 12, 2020, 3:43 PM IST

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. अद्यापही ते व्हेंटिलेटरवरच असल्याचे आर्मीच्या रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

"सध्या त्यांच्या हृदयाची गती नियमित आहे आणि ते व्हेंटिलेटरवर आहेत" असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मंगळवारी रात्रीपर्यंत त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले होते. त्यानंतरही त्यांच्या तब्येतीत विशेष असा सुधार झाला नसल्यामुळे त्यांना अजूनही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

मुलीने केले भावनिक ट्विट..

या परिस्थितीत प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एक भावनिक संदेश ट्विटरवर पोस्ट केला आहे.

"गेल्या वर्षी 8 ऑगस्ट हा दिवस माझ्यासाठी खूप आनंदी होता. कारण त्या दिवशी माझ्या वडिलांना देशाचा सर्वोच्च असणारा भारत रत्न पुरस्कार मिळाला होता आणि बरोबर एक वर्षानंतर 10 ऑगस्टला माझे वडील गंभीररीत्या आजारी पडले आहेत. देवाने त्यांच्यासाठी जे काही चांगले असेल ते करावे आणि मला एकाच वेळी सुखदुःख हे दोन्ही स्वीकारण्याची क्षमता द्यावी. तसेच मी सर्वांचे या क्षणी आभार व्यक्त करते" अशा आशयाचे भावनिक ट्विट त्यांनी पोस्ट केले आहे.

मुखर्जींना सोमवारीच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. ट्विटरवरून त्यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये गाठ आढळल्याने मुखर्जी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत ही गाठ काढण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details