कुपवाडा-जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आठ टप्प्यात मतदान होत आहे. शुक्रवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. तर 7 डिसेंबरला चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या निवडणुकीत कुपवाडा जिल्ह्यात 11 उमेदवार आपले नशिब आजमावणार आहेत. या 11 उमदेवारांमध्ये एका पाकिस्तानी महिलेचाही समावेश आहे. संबधित महिला शरण आलेल्या दहशतवाद्याची पत्नी आहे. सोमाया सदाफ असे या महिलेचे नाव आहे. जिल्ह्यातील ड्रेगमुल्ला या मतदारसंघातून त्या निवडणूक लढवणार आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आठ टप्प्यात मतदान कुपवाडामधील अब्दुल मजीद भट हा दहशतवादी 1990 मध्ये पाकिस्तानला गेला होता. तेव्हा पाकव्याप्त काश्मीरच्या मुजफ्फराबादमधील रहिवासी असलेल्या सोमायाने 2002 मध्ये त्याच्याशी लग्न केले. त्या दोघांना 4 अपत्य आहेत. 2010 मध्ये सरकारच्या दहशतवादी आणि त्यांच्या कुटुंबासाठी असलेल्या पुनर्विकास धोरणाअंतर्गत अब्दुल मजीद भट आणि सोमाया हे नेपाळमार्गे काश्मीरमध्ये परतले होते. काश्मीरमध्ये आल्यानंतर कुटुंब चालवण्यासाठी अब्दुल भटने पोल्ट्री फार्म सुरू केला होता. सध्या हे दाम्पत्य एक डेयरी फार्म चालवते.
शरणागती पत्कारलेल्या दहशतवाद्याची पत्नी लढवतीय निवडणूक महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवायचा आहे. माझ्यासारख्याच अनेक महिला पाकिस्तानातून काश्मीरमध्ये आल्या आहेत. त्यांनी गरिबी संपवण्यासाठी काम केले पाहिजे, असे सोमाया म्हणाल्या. सरकारने आम्हाला पुनर्विकास धोरणाअंतर्गत येथे आणले होते. मात्र, दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केली नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
शरणागतीचे धोरण -
जम्मू काश्मीरमध्ये अनेक तरूण काही दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले होते. या भटकलेल्या तरुणांना मार्गावर आणण्यासाठी 1995 मध्ये सरकारने काश्मीरमध्ये पहिले शरणागतीचे धोरण आणले. त्यात आत्मसमर्पण करणार्या अतिरेक्यांना दीड लाख रुपये मुदत ठेव. तसेच मासिक 1 हजार 800 रुपये वेतन आणि काही व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर 2010 मध्ये मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याचप्रकारचे एक धोरण जाहीर केले. 1989 ते 2009 दरम्यान काश्मीरच्या पलीकडे शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्यांनी शरण यावे, त्यांचा पुनर्विकास केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. या धोरणाअंतर्गत अब्दुल मजीद भट आणि सोमाया हे काश्मीरला परतले होते.
जिल्हा परिषद निवडणूक -
जम्मू काश्मीरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राज्यातील प्रमुख 6 पक्ष एकत्र निवडणूक लढत आहे. कलम 370 हटवण्यात आल्यानंतर राज्यातील नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, सीपीआय (एम), अवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू-कश्मीर पीपल्स मूव्हमेंट हे पक्ष 'गुपकर अलायन्स' म्हणून एकत्र निवडणूक लढत आहे. यामध्ये भाजपा आणि काँग्रेसचे उमेदवार मैदानात आहेत. सद्य परिस्थितीनुसार राज्यात गुपकर अलायन्स काश्मीरमध्ये मजबूत आहे. तर भाजपाची जम्मूवर पकड आहे.
हेही वाचा -DDC Elections : जम्मू काश्मीरमध्ये तिसऱ्या टप्प्यात ५०.५३ टक्के मतदान