महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'भारतीय संरक्षण व्यवस्थेमध्ये सरसेनाध्यक्षांच्या पदाची निर्मिती करण्याचा निर्णय योग्य' - caa

भारतीय संरक्षण व्यवस्थेमध्ये सरसेनाध्यक्षांच्या पदाची निर्मिती करण्याचा हा निर्णय  चांगला असल्याचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते पी.चिदंबरम-रावत
काँग्रेस नेते पी.चिदंबरम-रावत

By

Published : Jan 1, 2020, 6:03 PM IST

नवी दिल्ली - बिपीन रावत यांची भारताचे सरसेनाध्यक्ष म्हणजेच ''चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संरक्षण व्यवस्थेमध्ये सरसेनाध्यक्षांच्या पदाची निर्मिती करण्याचा हा निर्णय चांगला असल्याचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी म्हटले आहे.

भारतीय संरक्षण व्यवस्थेमध्ये सरसेनाध्यक्षांच्या पदाची निर्मिती करण्याचा निर्णय देशाच्या हितासाठीचा आहे. या पदासाठी ज्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या योग्यतेबद्दल मी मत व्यक्त करणार नाही. कदाचीत ते एक चांगले जनरल असतील. मात्र, या पदासाठीच्या निवड प्रकियेबद्दल मला काही माहिती नसल्याचे चिदंबरम म्हणाले.

चिदंबमर यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनसीआर) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीवरून (एनपीआर) केंद्र सरकारवर टीका केली. 2010 मध्ये आम्ही राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) केली होती. तेव्हा एनपीआर अर्जामध्ये नागरिकांचे फक्त 15 तपशील घेतले होते. मात्र भाजप सुरू करत असलेल्या एनपीआरमध्ये नागरिकांचे 21 तपशील मागितले जात आहेत. या अर्जामध्ये आई-वडिलांचे जन्मस्थान, आधारनंबरसंबंधी माहिती मागितली जात आहे. एनपीआर हे एनआरसी प्रकियेकडे पडणारे पहिले पाऊल आहे. त्यामुळेच काँग्रेस एनपीआर आणि एनसीआर या दोन्हींचा विरोध करत असल्याचे चिदंबरम म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details