महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुजफ्फरपूरच्या हॉटेलमध्ये सापडलेली 'ती' ईव्हीएम व व्हीव्हीपॅट राखीव, चौकशी होणार - मुजफ्फरपूर

एकाद्या हॉटेलमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन घेऊन जाणे नियमांच्या विरुद्ध असल्याने झाल्याप्रकाराची चौकशी केली जाणार आहे. संबंधित अधिकारी अवदेस कुमार यांना मशीन हॉटेलमध्ये नेल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आल्याचे अलोक रंजन घोष यांनी सांगितले.

मुजफ्फरपूर

By

Published : May 7, 2019, 11:13 AM IST

Updated : May 7, 2019, 11:24 AM IST

मुजफ्फरपूर (बिहार) - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात काल (सोमवार) बिहारमध्ये मतदान झाले. मुजफ्फरपूरमध्ये मतदान केंद्राजवळील हॉटेलमध्ये २ ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट सापडले होते. याप्रकारामुळे मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. हॉटेल परिसरात ईव्हीएम मशीन सापडल्याने त्याची सर्वत्र चर्चा आहे.

याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी अलोक रंजन घोष यांनी सांगितले की, तेथील सेक्टर मजिस्ट्रेट अवदेश कुमार यांच्याकडे ४ ईव्हीएम मशीन राखीव ठेवण्यात आली होती. कोणत्या मतदान केंद्रावर मशीन बंद पडल्यास त्यांचा वापर करण्यात येणार होता. घटनेवेळी अवदेश कुमार यांच्या गाडीचा चालक मतदान करण्यासाठी केंद्रावर गेला होता. त्यावेळी अवदेश कुमार हे जवळच्या हॉटेलमध्ये गेले. तेव्हा त्यांच्या कारमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन होत्या. तेथील काही लोकांना मशीन दिसल्यानंतर त्यांनी गोंधळ घातला आणि तक्रार करण्यात आली. तेव्हा त्या परिसरात कार्यरत असलेले उप-विभागीय अधिकारी कुंदन कुमार घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ त्या मशीन ताब्यात घेतल्या.

तरीही अशा एकाद्या हॉटेलमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन घेऊन जाणे नियमांच्या विरुद्ध असल्याने झाल्याप्रकाराची चौकशी केली जाणार आहे. संबंधित अधिकारी अवदेस कुमार यांना मशीन हॉटेलमध्ये नेल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आल्याचेही अलोक रंजन घोष यांनी सांगितले.

Last Updated : May 7, 2019, 11:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details