हैदराबाद- 'ईटीव्ही'ला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रसंगी रामोजी फिल्म सिटी येथे 'ई टीव्ही'चा रौप्यमहोत्सव मोठ्या थाटात पार पडला. यावेळी रामोजी समुहाचे अध्यक्ष रामोजी राव यांचे नातू सुजय यांनी केक कापून आनंद साजरा केला. या कार्यक्रमाला रामोजी राव यांच्यासह त्यांचे कुटुंब व कर्मचारी उपस्थित होते.
ईटीव्हीच्या कर्मचाऱ्यांनी २५ वर्षांच्या प्रवासतील काही आठवणींना उजाळा दिला. २५ वर्षांपूर्वी २७ ऑगस्टला ईटीव्हीची मुहर्तमेढ रोवली गेली. त्या दिवशी दक्षिण भारतीय टीव्ही जगतात नवीन युगाची सुरुवात झाली होती. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीदेवीने ईटीव्ही चॅनलचे उद्घाटन केले होते. तेव्हा हे चॅनल करमणुकीचे चॅनल होणार असल्याचे ईनाडू समुहाचे अध्यक्ष रामोजी राव यांनी म्हटले होते. तेव्हापासून तेलुगू मनोरंजन विश्वाच्या स्वरुपात मोठा बदल झाला. ईटीव्हीने माध्यम क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाला वाट करून दिली. नवीन तंत्रज्ञांची निर्मिती केली आणि गुणवत्तापूर्ण कार्यक्रम प्रसारित केले. ईटीव्हीमुळे केबल टीव्ही ही तेलुगू कुटुंबातील एक परंपराच झाली. शहर तसेच ग्रामीण भागतही ईटीव्हीच्या विविध कार्यक्रमांनी नागरिकांच्या मनात स्थान निर्माण केले.
व्यवस्थापकीय संचालक सुमन यांच्या नेतृत्वाखाली चॅनलमध्ये काही नवीन बदल घडवून आणले. ईटीव्ही हा पहिला २४ तास चालणारा सॅटेलाईट तेलुगू चॅनल होता. ज्यावेळी नागरिकांना काही गीत ऐकण्यासाठी आठवडाभर वाट पहावी लागायची, त्यावेळी ईटीव्हीने रोज चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली होती. ईटीव्हीवर गायनाचे कार्यक्रम व्हायचे. पादुथा थीय्यागा, या गायन स्पर्धेचा कार्य ईटीव्हीवर प्रसारित व्हायचा. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रम्हण्यम हे करत होते. त्यानंतर, ईटीव्ही चॅनलने काही धारावाहिक देखील प्रसारित केल्या. अंथरांगालू, अन्वेशिता, लेडी डीटेक्टटीव्ह, गुप्पेडू मानासू या धारावाहिक इतक्या गाजल्या की त्या आजही लोकांच्या मनात घर करून आहेत.
यावेळी फक्त मोठेच नवे तर, लहान मुलांसाठी देखील मनोरंजक कार्यक्रम चॅनले प्रसारित केले होते. त्यामुळे, हे मुलांचेही आवडते चॅनल ठरले. फक्त मनोरंजनच नव्हे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना देखील स्थान दिले. चॅनलतर्फे अन्नदाता हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रमही खूप गाजला. त्याचबरोबर, ईटीव्ही न्यूज हे बातम्या देणारे चॅनल देखील प्रसारित झाले. यावर जगाच्या कानाकोपऱ्यातील बातम्या निपक्षपातीपणे मांडल्या जायच्या. त्यामुळे हे चॅनल देखील नागरिकांच्या पंसतीस उतरले. अशी अनेक चॅनल्स असलेल्या ईटीव्ही समुहाने आजही आपल्या प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. तसेच, चॅनलच्या माध्यमातून ईटीव्हीने नवे कलाकार, गीतकार, लेखक आणि तंत्रज्ञ दिले आहेत.