महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

फेमिना मिस इंडिया २०१८ ची विजेती अनुकृती वास म्हणाली... "वन नेशन वन अॅप' ईज बेस्ट" - फेमिना मिस इंडिया २०१८ ची विजेती अनुकृती वास

फेमिना मिस इंडिया २०१८ किताब मिळवलेली अनुकृती वास हिने ईटीव्ही भारतच्या दर्जेदार आशयाचे कौतूक केले आहे. ईटीव्हीला दिलेल्या एका स्पेशल मुलाखतीमध्ये 'एक देश एक अॅप' हे खुपच चांगले असल्याचं ती म्हणाली.

अनुकृती वास

By

Published : Oct 19, 2019, 5:41 PM IST

Updated : Oct 19, 2019, 6:21 PM IST

कानपूर - फेमिना मिस इंडिया २०१८ किताब मिळवलेली अनुकृती वास हिने ईटीव्ही भारतच्या दर्जेदार आशयाचे कौतूक केले आहे. ईटीव्हीला दिलेल्या एका स्पेशल मुलाखतीमध्ये 'एक देश एक अॅप' हे खूपच चांगले असल्याचं ती म्हणाली.

फेमिना मिस इंडिया २०१८ ची विजेती अनुकृती वास म्हणाली... "वन नेशन वन अॅप' ईज बेस्ट"


शहरातील महाविद्यालयात एका फॅशन शोचे परिक्षण करण्यासाठी ती आली होती. तरुण मुलं त्यांच्या स्वप्नाच्या दिशेने जात आहेत. मला आनंद आहे की, मी या कार्यक्रमाचा हिस्सा झाले, असे ती म्हणाली.


ईटिव्ही भारतच्या अंतर्भूत आशयाने मी प्रभावित झाले. ईटीव्ही भारत डिजिटल प्लॅटफॉर्म हे दर्जेदार आशय देत आहे. बातमी असो वा वेगवेगळ्या विषयावरील स्पेशल स्टोरीज असो अचूक आणि उत्तम माहिती पोर्टल युर्जसला पुरवत आहे. ईटिव्ही भारत हे १३ भाषांमध्ये असून हे अॅप चांगल्या आशयामध्ये माहिती देते असल्यामुळे मी हे अॅप डाऊनलोड केले असून इतरांनी करण्यास सांगितले असल्याचं ती म्हणाली.


देशातल्या विविध राज्यांमधून आलेल्या ३० सौंदर्यवतींमधून अवघ्या १९ व्या वर्षी अनुकृतीने ‘मिस इंडिया’चा किताब पटकावला होता. अनुकृती यांनी तामिळनाडूमधील लोयोला महाविद्यालयातून फ्रेंच या विषयात पदवीचं शिक्षण घेतलं आहे.


जाणून घ्या 'ईटीव्ही भारत' विषयी -
'ईटीव्ही भारत' हे भारतातील प्रमुख १३ भाषांमध्ये बातम्या पोहोचवते. ज्यामध्ये हिंदी, उर्दू, तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, बंगाली, पंजाबी, असामी ओडिया आणि इंग्रजी या भाषांचा समावेश आहे. डिजिटल न्यूज रूममध्ये क्रांती आणल्याबद्दल ईटीव्ही भारतचा विशेष उल्लेख केला आहे.


व्यापक डिजिटल प्लॅटफॉर्म -
व्यापक असा डिजिटल प्लॅटफॉर्म आणि देशभरात पसरलेल्या जवळपास ५,००० मोबाईल पत्रकारांच्या मदतीने ईटीव्ही भारत हे दुर्लक्षित आणि दुर्गम भागातील बातमीकडेदेखील गुणवत्तापूर्वक लक्ष देते.


दर पाच मिनिटांनी एक 'लाईव्ह बुलेटिन' -
ईटीव्ही भारत 'न्यूज टाईम' हे सदर चालवते. यामध्ये दर पाच मिनिटांनी एक 'लाईव्ह बुलेटिन' सादर केले जाते. ज्यात ताज्या घडामोडी संक्षिप्त आणि वेगवान पद्धतीने सादर केल्या जातात. यामध्ये राजकीय, सामाजिक, शेतीविषयक, शिक्षण, आरोग्य, खेळ, व्यापार आणि मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रांतील बातम्यांचा समावेश असतो.


यासोबतच ईटीव्ही भारत हे विविध तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांशी चांगल्या प्रकारे संलग्न आहे. ज्यामध्ये, अवेको, शरण्यू टेक्नॉलॉजीस, रोबोसॉफ्ट टेक्नॉलॉजीस, हार्मोनिक्स अशा विविध कंपन्यांचा समावेश आहे. ईटीव्ही भारत हे मोबाइल फोन आणि टॅब्लेटद्वारे दर्शकांच्या मागणीवर आधारित कंटेंट पुरवण्याची सुविधा देते. २१ मार्च २०१९ रोजी सुरू झालेले, 'रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद' स्थित, विशेष असे डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.


सर्वाधिक खप असलेले तेलुगु दैनिक - ईनाडू आणि सात तेलुगु चॅनल्स असलेले ईनाडू टेलिव्हिजन यांची मालकी असलेले 'रामोजी ग्रुप' हे भारतातील सर्वात विश्वासू असे मीडिया हाऊस आहे. जे आपल्या सत्यतेसाठी आणि निःपक्षपातीपणासाठी प्रसिद्ध आहे.

Last Updated : Oct 19, 2019, 6:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details