मुंबई -देशभरामध्ये मागील 24 तासांमध्ये देशामध्ये 9 हजार 971 कोरोनाबाधित आढळले असून 287 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत येत्या सोमवारपासून (8 जून) मुंबईच्या बेस्ट बसमध्ये आता सामान्य नागरिकांनाही प्रवासाची मुभा असणार आहे. राज्य शासनाने 30 माकडे (रेसस प्रजातीची) पकडण्याची परवानगी दिली आहे. या माकडांवर कोरोनावरील लसीचे प्रयोग करण्यात येणार आहेत... तर 75 दिवसांनंतर केरळमधील शबरीमला मंदिर 14 जूनला अय्यप्पा भक्तांसाठी खुले होणार आहे... जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाच्या जवानांची मोहीम घातली घेतली आहे. आज सकाळपासून (रविवार) दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्याच्या रेबेन परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरू आहे. यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 9 हजार 971 कोरोनाबाधित आढळले असून 287 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्यापेक्षा अधिक झाला आहे. तर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत.
सविस्तर वाचा -देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 46 हजार 628 वर
- श्रीनगर- जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाच्या जवानांची मोहीम घातली घेतली आहे. आज सकाळपासून (रविवार) दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्याच्या रेबेन परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरू आहे. यात जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर वाचा -J-K: शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान?
- मुंबई - ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत येत्या सोमवारपासून (8 जून) मुंबईच्या बेस्ट बसमध्ये आता सामान्य नागरिकांनाही प्रवासाची मुभा असणार आहे. बेस्ट प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने व मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
सविस्तर वाचा -मुंबईकरांना दिलासा.. सोमवारपासून बेस्टच्या बसमधून सामान्य लोकांना करता येणार प्रवास
- मुंबई/यवतमाळ -राज्य शासनाने 30 माकडे (रेसस प्रजातीची) पकडण्याची परवानगी दिली आहे. या माकडांवर कोरोनावरील लसीचे प्रयोग करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) शनिवारी (दि.6जून) दिली.
सविस्तर वाचा -कोरोनावरील लसीचा माकडांवर होणार प्रयोग.. राज्य शासनाने दिली परवानगी
- नोएडा (दिल्ली) - गाझियाबादच्या खोडा गावातील गर्भवती महिलेला नोएडामध्ये वैद्यकीय उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने शनिवारी दिले. महिलेला रुग्णवाहिकेतून नोएडा येथे आणण्यात आल्याचे सांगितले. मात्र, येथील सरकारी किंवा खासगी कोणत्याही रुग्णालयाने तिला दाखल करून घेतले नाही. त्यामुळे उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला, असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.