हैदराबाद -पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन या दोघांमध्ये ऑनलाइन शिखर परिषद पार पडली. यामध्ये आरोग्य सेवा, व्यापार आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय संबंधाना आणखी व्यापक आणि मजबूत करण्यावर चर्चा झाली. तर राज्यात आज मुंबईत गुरुवारी सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. तसेच तेलंगणा राज्यातून महाराष्ट्राच्या सीमेलगत आलेल्या दोन वाहनांमध्ये दोन कोटी वीस लाखांची रक्कम आढळली आहे. ही रक्कम नक्षलवाद्यांना पोहोचविण्यासाठी भामरागडला नेण्यात येत होती, असे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली, तर नाशकात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका पुण्यातील ग्रामीण भागाला देखील बसला असून केळी, आंब्याच्या बागा भूईसपाट झाल्या आहेत. तसेच केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूरने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यामध्ये ऑनलाइन शिखर परिषद पार पडली. यामध्ये आरोग्य सेवा, व्यापार आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय संबंधाना आणखी व्यापक आणि मजबूत करण्यावर चर्चा झाली. यावेळी बोलताना, भारत ऑस्ट्रेलिया संबंध दृढ करण्याची ही 'योग्य वेळ आणि योग्य संधी' असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
वाचा सविस्तर -नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान स्कॉट मोरिसन यांची 'ऑनलाईन शिखर परिषद'; भारत-ऑस्ट्रेलिया संबंध सुदृढ करणार
मुंबई - आज गुरुवारी सकाळपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला असला तरी मुंबईमध्ये रेड अलर्ट अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. किंग्स सर्कल या सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. मात्र, याचा वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.
वाचा सविस्तर -मुंबईत पावसाची दमदार हजेरी, सखल भागात साचले पाणी
गडचिरोली - तेलंगाणा राज्यातून महाराष्ट्राच्या सीमेलगत आलेल्या दोन वाहनांमध्ये दोन कोटी वीस लाखांची रक्कम आढळली आहे. ही रक्कम नक्षलवाद्यांना पोहोचविण्यासाठी भामरागडला नेण्यात येत होती, असे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. सिरोंचा पोलिसांनी या प्रकरणी तेलंगाणाच्या आणखी दोन बड्या कंत्राटदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
वाचा सविस्तर- नक्षलवाद्यांना निधी पुरविल्याप्रकरणी तेलंगणाच्या दोन बड्या कंत्राटदारांसह चौघांवर गुन्हा
नाशिक- जिल्ह्यासह शहरात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला या मोसमातील पहिला पूर आल्याचे पाहायला मिळाले. गोदावरी नदीच्या या पुरामुळे शहरातील नदी काठचे रामकुंड, लक्ष्मणकुंड पाण्याखाली गेले आहेत. तसेच गांधी तलावही ओसंडून वाहू लागला आहे.
वाचा सविस्तर -नाशकात गोदावरीला पूर; राम-लक्ष्मण कुंड पाण्याखाली, गांधी तलाव ओव्हर फ्लो