मुंबई -काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या मारहाणीप्रकरणी प्रधानमंंत्री नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले आहे... लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत... आज (बुधवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ५५ पैशांची तर डिझेलच्या दरात ६९ पैशांची वाढ करण्यात आली... कोरोना विषयावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हीडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून जम्मू काश्मीरसह 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- नई दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या मारहाणीप्रकरणी प्रधानमंंत्री नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले आहे. त्यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदी गप्प का..? लपत का आहात..? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
सविस्तर वाचा -पंतप्रधान गप्प का..?, राहुल गांधींनी भारत-चीन प्रश्नावरुन केंद्राला धरले धारेवर
- नवी दिल्ली- लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत. या मारहाणीत भारतीय सैन्य दलातील आणखी चार जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चिनी सैन्य दलातीलही अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. वृतसंस्था एएनआयला सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
सविस्तर वाचा -भारत-चीन सैन्य मारहाण प्रकरण: भारतीय सैन्यातील आणखी चार जवान गंभीर
- मुंबई - भारत-चीनच्या सीमेवरील गलवान येथे सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली. यामध्ये भारताच्या तब्बल २० जवानांना वीरमरण आले. मात्र, याचवेळी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' या उपक्रमातंर्गत महाराष्ट्रात चीनकडून मोठी गुतंवणूक करण्यात आली आहे. सीमेवर भारतासोबत वेगळी भूमिका आणि उद्योग क्षेत्राबाबत वेगळे दृश्य दिसते आहे. सीमेवर भारतासोबत वेगळी वागणूक आणि व्यवहाराचा मुद्दा आला की महाराष्ट्रासोबत मैत्रीपूर्ण गुंतवणूक करार, अशा दोन पातळ्यांवर चीनची वागणूक दिसत आहे.
सविस्तर वाचा -भारत-चीन सीमेवर तणाव; दुसरीकडे महाराष्ट्रात चीनची ५ हजार कोटींची गुंतवणूक
- शिमला (हिमाचल प्रदेश)- भारत आणि चीन सीमा प्रश्नावरून लडाख प्रदेशातील गलवान भागामध्ये दोन्ही देशाचे सैन्य भिडले होते. यावेळी झालेल्या हाणामारीत 43 चिनी सैनिक मारले गेले, तर भारताचे 20 जवान हुतात्मा झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हिमाचर प्रदेश प्रशासनाने राज्यातील काही भागांमध्ये हाय अलर्ट घोषित केला आहे.
सविस्तर वाचा -भारत-चीन संघर्ष: हिमाचल प्रदेशमधील दोन जिल्ह्यामध्ये 'हाय अलर्ट'
- नवी दिल्ली- लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत, तसेच त्यांचे अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. एएनआयला सुत्रांनी ही माहिती दिल्याची माहिती दिली.