मुंबई -विलेपार्ले अग्निशमन केंद्रातील एका जवानाचा सेव्हन हिल रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे... आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रायगड जिल्ह्याला भेट देणार होते. मात्र, हा दौरा आता रद्द करण्यात आला आहे... चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांच्यासह महिला क्रिकेटपटू स्मृती मानधाना आणि दिप्ती शर्मा यांना थांबण्याच्या ठावठिकाणाची माहिती न पुरविल्यामुळे राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीतर्फे (नाडा) नोटीस बजावण्यात आली, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरणाचे काम अग्निशमन दलाकडून केले जात आहे. यामुळे अग्निशमन दलातील 91 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विलेपार्ले अग्निशमन केंद्रातील एका जवानाचा सेव्हन हिल रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे अग्निशमन दलातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा आठवर पोहोचला आहे.
सविस्तर वाचा -आठवा बळी... कोरोनामुळे मुंबई अग्निशमन दलातील आणखी एका जवानाचा मृत्यू
- पुणे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात अंतिम वर्षाच्या परीक्षेसंबंधीच्या भूमिकेमध्ये विसंगती आहेत. यावर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मत व्यक्त केले. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत, या मताचा मी आहे. पण, तातडीने परीक्षा घ्याव्यात या मताचा नाही, असे ते म्हणाले.
सविस्तर वाचा -अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत पण... वाचा काय म्हणाले केंद्रीय मंत्री रामदास आठवले
- मुंबई : रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रायगड जिल्ह्याला भेट देणार होते. मात्र, हा दौरा आता रद्द करण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळामुळे प्रशासन हे पंचनामे व इतर मदत कार्यात व्यस्त आहे. आपदग्रस्तांना अनुदान वाटप, साहित्य वाटप यापूर्वीच सुरू झाले आहे. हे मदत कार्य अधिक वेगाने होणे महत्त्वाचे असल्याने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
सविस्तर वाचा -मुख्यमंत्र्यांचा रायगड दौरा रद्द; प्रशासनाचे मदत कार्य वेगाने होण्यासाठी निर्णय..
- हैदराबाद : कोरोना महामारी, आणि भारत-चीन सीमेवरील तणाव पाहता, जनतेमध्ये चीनविरोधाची लाट पसरली आहे. समाजमाध्यमांमध्ये चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत. मात्र, आपण खरंच चिनी वस्तूंपासून वेगळे होऊ शकतो का..?
सविस्तर वाचा -चिनी वस्तूंचा वापर टाळणे खरंच शक्य आहे का?
- नवी दिल्ली -कोरोनामुळे देशाची आर्थिक पिछेहाट झाली आहे. अर्थव्यवस्था कमकुवत झाली असून सरकारकडून अर्थव्यवस्था सावरण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी सरकारला अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून इशारा दिला आहे. 'जर सरकारने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पैसे बाजारात सोडले नाही तर गरीबांचा जीव जाईल, मध्यमवर्ग हा नवा गरीब झालेला असेल आणि भांडवलदार देशाला विकत घेतील, असा इशारा राहुल गांधी यांनी ट्विटरवरून दिला आहे.
सविस्तर वाचा -'.. तर गरीबाचा जीव जाईल अन् मध्यमवर्ग हा नवा गरीब असेल'
- मुंबई - चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांच्यासह महिला क्रिकेटपटू स्मृती मानधाना आणि दिप्ती शर्मा यांना थांबण्याच्या ठावठिकाणाची माहिती न पुरविल्यामुळे राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीतर्फे (नाडा) नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, बीसीसीआयने उशीर होण्यासाठी 'पासवर्डमध्ये गडबड' झाल्याचा हवाला दिला आहे.