मुंबई -भारतात सलग बाराव्या दिवशी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज (गुरुवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ५३ पैशांची तर डिझेलच्या दरात ६४ पैशांची वाढ करण्यात आली... भारताची आठव्या वेळेस संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली... कोरोनातून बरा झालेल्या पोलीस कर्मचार्याचा अहमदनगरच्या राहुरीमधे झालेल्या चारचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला, यासह टॉप-१० बातम्या...
- नवी दिल्ली - भारताची आठव्या वेळेस संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली. सर्वसाधारण सभेच्या एकूण 193 सदस्यांपैकी 184 सदस्यांनी बुधवारी झालेल्या निवडणुकीमध्ये भारताच्या बाजूने मतदान केले. भारतासोबतच आयर्लंड, मेक्सिको, आणि नॉर्वेने सुद्धा ही निवडणूक जिंकली तर कॅनडाला पराजय स्वीकारावा लागला. यामुळे भारत आता 2021 ते 2022 या कालावधीसाठी सुरक्षा परिषदेचा सदस्य असणार आहे. भारताला मिळालेले अस्थायी सदस्यत्त्व हे खूप महत्त्वाचं असल्याचे मानले जाते. ज्यामुळे भारत शक्तीशाली देशांकडे वाटचाल करत आहे.
सविस्तर वाचा -संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेवर भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड
- अहमदनगर - कोरोनातून बरा झालेल्या पोलीस कर्मचार्याचा अहमदनगरच्या राहुरीमधे झालेल्या चारचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला. माधव संपत शिरसाठ (वय 28 वर्षे) असे मृत पोलिसाचे नाव आहे.
सविस्तर वाचा -कोरोनातून वाचला.. पण 'या' कोरोना योद्ध्याने अपघातात गमावला जीव
- नवी दिल्ली - भारतात सलग बाराव्या दिवशी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज (गुरुवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ५३ पैशांची तर डिझेलच्या दरात ६४ पैशांची वाढ करण्यात आली. दिल्लीमध्ये आजचे पेट्रोलचे दर ७७.८१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७६.४३ रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर आहेत. मात्र, स्थानिक बाजारपेठेमध्ये याच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे.
सविस्तर वाचा -महागाईचा भडका..! पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर
- मुंबई - लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दररोज पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. पेट्रोलियम कंपन्यांचा हा दरवाढीचा सपाटा मंगळवारी देखील कायम राहिला. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यामागे अनेक कारणे आहेत.
सविस्तर वाचा -का उडतोय पेट्रोल-डिझेलचा भडका? जाणून घ्या कारणे
- मुंबई - कोरोनामुळे देशभर २५ मार्च नंतरच्या देशांतर्गत वा विदेशी पर्यटन सहलींसाठी ज्या प्रवाशांनी आरक्षण केले होते, त्या प्रवाशांना परतावा नाकारणाऱ्या पर्यटन कंपन्यांविरोधात मुंबई ग्राहक पंचायतीने आक्रमक पाऊल उचलले आहे. त्यानुसार पर्यटन सहलींवरील परताव्याबाबत मुंबई ग्राहक पंचायतीकडून ऑनलाईन सर्वेक्षण केले जाणार आहे. हे सर्वेक्षण बुधवार, २४ जून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन उपलब्ध असेल. तरी सर्व संबंधित ग्राहकांनी या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीने केले आहे.
सविस्तर वाचा -पर्यटन कंपन्यांविरोधात मुंबई ग्राहक पंचायतीचे आक्रमक पाऊल; परताव्याबाबत ऑनलाईन सर्वेक्षण
- मुंबई- शालेय शिक्षण विभागाने राज्यभरात ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षणाचा मोठा गाजावाजा करत दोन दिवसांपूर्वी त्यासाठीची सुरूवातकेली आहे. अशात आता राज्याच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेनुसार ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल शिक्षणाचा मोठा बोजवारा उडू शकतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात केवळ 61 टक्के विद्यार्थ्यांना व्हाट्सअॅपद्वारे संपर्क होऊ शकतो. तर, उर्वरित 39 टक्के विद्यार्थी हे व्हॉट्सअॅपच्या संपर्काबाहेर आहेत. राज्यात ज्यांच्याकडे मोबाईलच नाही अशांची संख्या ही तब्बल 31. 76 टक्के इतकी आहे.