मुंबई -लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत, तसेच त्यांचे अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत... भारत-चीन सीमावाद चिघळल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एकामागोमाग एक अशा दोन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. यामध्ये लडाखमधील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला... कोविड-१९ रुग्णांच्या जगण्याची शक्यता वाढवणाऱ्या औषधाचा शोध लावल्याचा लंडनच्या संशोधकांनी दावा केला आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- नवी दिल्ली- लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत, तसेच त्यांचे अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. एएनआयला सुत्रांनी ही माहिती दिल्याची माहिती दिली.
सविस्तर वाचा -भारत-चीन सैन्याच्या हाणामारीत चीनचे ४३ जवान ठार
- नवी दिल्ली : भारत-चीनच्या सीमेवरील गलवान येथे सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली. यामध्ये भारताच्या तब्बल २० जवानांना वीरमरण आल्याची माहिती समोर येत आहे. ही संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आपले १० जवान बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.
सविस्तर वाचा -भारत-चीन सैनिकांमधील झटापटीला नवे वळण; तब्बल २० जवानांना वीरमरण..
- नवी दिल्ली -गलवान परिसरातील भारत चीन सीमेवर सैनिकांच्या हाणामारीत चीनी सैनिकांचीही जिवितहाणी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या संपादकांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याची माहिती समोर आली आहे. गलवान व्हॅली परिसरात सैनिकांच्या हाणामारीत चीनी सैनिकांचीही जीवितहाणी झाल्याचे मला समजले आहे, असे ट्विट संपादक हु शिजीन यांनी ट्विट केले आहे.
सविस्तर वाचा -गलवान व्हॅलीतील सैनिकांच्या हाणामारीत चीनचीही जीवितहानी...चिनी वृत्तपत्राच्या संपादकाची कबुली
- नवी दिल्ली- लडाखमधील गलवान व्हॅलीत भारत-चीन सीमावाद चिघळल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एकामागोमाग एक अशा दोन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. यामध्ये लडाखमधील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत एका अधिकाऱ्यासह दोन जवानांना वीरमरण आले आहे. त्यानंतर तणाव आणखीनच वाढला आहे.
सविस्तर वाचा -भारत- चीन सीमावाद चिघळल्याने संरक्षणमंत्र्यांच्या एकामागोमाग एक उच्चस्तरीय बैठका
- नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान भागात भारत चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱयासह दोन जवानांना विरमरण आले. यावरून काँग्रेसने भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप हा सर्व प्रकार काहीही न करता शांतपणे पाहत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गप्प का? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते रणदिप सुरजेवाल यांनी केला आहे.
सविस्तर वाचा -भारत- चीन सीमा वाद: पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गप्प का? काँग्रेसचा सवाल
- लंडन :कोविड-१९ रुग्णांच्या जगण्याची शक्यता वाढवणाऱ्या औषधाचा शोध लावल्याचा लंडनच्या संशोधकांनी दावा केला आहे. 'डेक्सामेथासॉन' हे स्टेरॉईड कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे हे स्टेरॉईड स्वस्त आणि जगभरात सगळीकडे सहजरीत्या उपलब्ध होईल असे आहे.