मुंबई - जम्मू-काश्मीरच्या शोपियान तुर्कवांगम भागात दहशतवांद्याशी झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला... देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही हे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिसून आले आहे. तीच गत महाराष्ट्राचीही झाली असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.... भारताची आघाडीची महिला धावपटू हिमा दासची यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या शोपियान तुर्कवांगम भागात आज (मंगळवार) सकाळी, भारतीय जवान आणि दहशतवांद्यामध्ये चकमक झाली. यात भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. ही माहिती काश्मीर झोनच्या पोलिसांनी दिली.
सविस्तर वाचा -J&K : शोपियानमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार, गेल्या १७ दिवसात २७ जणांचा खात्मा
- अकोला- देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही हे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिसून आले आहे. तीच गत महाराष्ट्राचीही झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर निर्णय ढकलून मोकळे होतात. आता शाळेबाबतही राज्य शासन निर्णय शाळांवर ढकलून मोकळे झाले, अशा निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला.
सविस्तर वाचा -'सरकारची निर्णय क्षमता संपली, सरकारच्या निर्णयाचा धिक्कार'
- मुंबई- राज्यातील शाळा कधी सुरू करायच्या यासंदर्भात सोमवारी शालेय शिक्षण विभागाने जीआर काढून त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक वर्गातील एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल आणि एका वर्गात २० ते ३० पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या नसेल अशी व्यवस्था शाळांमध्ये आणली जाणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत शुल्क आणि डोनेशनच्या नादात विद्यार्थ्यांना शाळांमध्ये कोंबून बसवणाऱ्या शेकडो शाळांची अडचण होणार आहे. अनेकांना विद्यार्थी कसे बसवायचे याचे नियोजन करताना, आपल्या शाळांची संपूर्ण रचनाच बदलावी लागणार आहे.
सविस्तर वाचा -एका बेंचवर एकच विद्यार्थी... शेकडो शाळांची होणार अडचण
- मुंबई - 950 हून अधिक कोरोना मृत्यू आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता दडवण्यात आले, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. इतके अक्षम्य दुर्लक्ष का आणि असे करणार्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार, असा सवाल फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला पत्र लिहून विचारला आहे.
सविस्तर वाचा -मुंबईत 950 हून अधिक कोरोना मृत्यू दडवले? देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप
- मुंबई- राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टीव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे. राज्यात सोमवारी पाच हजार ७१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ४९ झाली आहे. दरम्यान, सोमवारी २ हजार ७८६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात ५० हजार ५५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा -दिलासादायक..! राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्यांहून अधिक
- गुवाहाटी- भारताची आघाडीची महिला धावपटू हिमा दासची यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. आसाम सरकारने यंदाच्या वर्षासाठी हिमा दासचे नाव पाठवले आहे. आसाम क्रीडा विभागाचे सचिव दुलाल चंद्र दास यांनी हिमाच्या नावाची शिफारस करणारे पत्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला पाठवले आहे. दुसरीकडे महिला बॉक्सर लोव्हलीना बोरगोहैन हिचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे.