मुंबई -राज्यात आज (सोमवार) १,९६२ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले असून कोरोनामुक्तांची एकूण संख्या ६७ हजार ७०६ झाली आहे... मुंबईत आज (सोमवार) कोरोनाचे 1,128 नवीन रुग्ण आढळून आले असून 66 जणांचा मृत्यू झाला आहे... धुळे शहराजवळील लळिंग येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एस.एस.व्ही.पी. इंजिनिअरिंग कॉलेजच्या 6 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे धुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे... सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनावर मात केली आहे, यासह ईटीव्ही भारतच्या इतर टॉप-१० बातम्या...
- मुंबई- राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना आज ३७२१ नवीन रुग्णांचे निदान आज झाले आहे. सध्या राज्यात ६१ हजार ७९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज राज्यातील १९६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून कोरोनामुक्तांची एकूण संख्या ६७ हजार ७०६ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा -CORONA : राज्यात ३,७२१ नवे कोरोना पॉझिटिव्ह..६ लाख नागरिक होम क्वारंटाईन
- मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा राज्यतही प्रसार होते आहे. त्यातही मुंबई शहर हे जणू कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याचे दिसत आहे. मुंबईत आज (सोमवार) कोरोनाचे 1,128 नवीन रुग्ण आढळून आले असून 66 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 67,635 वर पोहचला आहे, तर मृतांचा आकडा 3735 वर पोहचला आहे. मुंबईत आतापार्यंत 34,119 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या मुंबईत 29781 सक्रीय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
सविस्तर वाचा -मुंबईत कोरोनाचे 1,128 नवे रुग्ण तर 66 जणांचा मृत्यू
- धुळे- शहराजवळील लळिंग येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एस.एस.व्ही.पी. इंजिनिअरिंग कॉलेजच्या 6 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे धुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज (सोमवार) सायंकाळी घडली. मृत्यू झालेल्या 3 विद्यार्थ्यांपैकी 2 जण हे धुळे शहरातील रहिवासी आहोत. तर 1 जण अमळनेर येथील रहिवासी आहे. इतर 3 जणांना हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा -धुळे : पोहण्यासाठी गेलेल्या तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लळिंग धबधब्यात बुडून मृत्यू
- हैदराबाद - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्याकरिता राजू शेट्टींचे नाव निश्चित झाले आहे. मात्र शेट्टींचे नाव राष्ट्रवादी कॉग्रेसने सूचवल्याने त्यांच्या आमदारकीबाबत चर्चा सुरू आहे. विधानपरिषदेची आमदारकी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजू शेट्टींनी 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत केली आहे
सविस्तर वाचा -विशेष मुलाखत : 'म्हणून' विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारली - राजू शेट्टी
- हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी हुतात्मा कर्नल बी. संतोष बाबू यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच, मदत म्हणून पाच कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. कर्नल संतोष बाबू यांना भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झालेल्या झटापटीदरम्यान वीरमरण आले होते. या झटापटीत कर्नल बाबूंसोबत देशाचे २० जवान हुतात्मा झाले होते.