- मुंबई - राज्यात रविवारी कोरोनातून बरे झाल्यामुळे १६३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९७८ झाली इतकी आहे. राज्यात रविवारी एका दिवसात कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले. तर सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा -Coronavirus: राज्यात कोरोनावर मात केलेल्यांचा आकडा ५० हजारांवर, रविवारी ३,३९० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर
- नवी दिल्ली -दिल्लीत गंभीर बनलेल्या कोरोना समस्येवर चर्चा करण्यासाठी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. उद्या (सोमवारी) सकाळी 11 वाजता केंद्रीय गृहमंत्रालयात बैठक होणार आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, आप आणि बहुजन समाजवादी पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सविस्तर वाचा -दिल्लीत कोरोना स्थिती गंभीर; अमित शाहांनी बोलवली सर्वपक्षीय बैठक
- मुंबई - राज्यातील सर्व शाळा उद्या (सोमवार) ऑनलाईन सुरू केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शैक्षणिक सत्राची सुरुवात कधी करायची, यासाठी शालेय शिक्षण विभागच संभ्रमात सापडले आहे. आज दिवसभर झालेल्या अनेक बैठकांमध्येही यासाठीचा अंतिम निर्णय झाला नसल्याने त्यासाठीचे कोणताही निर्णय अथवा परिपत्रक विभागाकडून रात्री उशीरापर्यंत जारी करण्यात आलेले नाही. यामुळे उद्या राज्यातील शाळा या सरकारच्या आदेशाविनाच ऑनलाईन सुरू केल्या जाणार असल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे.
सविस्तर वाचा -शैक्षणिक सत्राच्या निर्णयासाठी शिक्षण विभाग संभ्रमात; उद्या निर्णयाची शक्यता
- मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आज आपल्या वांद्रे येथील घरात आत्महत्या केली. त्याचा मृतदेह पोलिसांनी महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन आज रात्री उशिरा पूर्ण होईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, सध्याची कोरोना संसर्गाची स्थिती पाहता रुग्णालय परिसरामध्ये चाहत्यांनी गर्दी करु नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा -सुशांत सिंग राजपूत आत्महत्या: रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन होणार पूर्ण
- मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने त्याच्या मुंबईतील वांद्रा पाली हिल स्थित राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे. सुशांतने आत्महत्या का केली याबद्दलची कुठलीही माहिती पोलिसांना अद्याप मिळालेली नाही. ज्याठिकाणी सुशांतने आत्महत्या केली ते घर त्याने सहा महिन्यांपूर्वी 3 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतले होते.
सविस्तर वाचा -सुशांतने ज्या घरात केली आत्महत्या, त्यासाठी दरमहा देत होता चार लाख ५० हजार रुपये भाडे
- मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अशात अभिनेत्याची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सुशांतनं आपल्या इन्स्टाग्रामवरुन आईसोबतचा एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट कोलाज फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.