महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top १० @ ११ AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर... - राज्यातील घडामोडी

राज्यासह देश विदेशातील सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या.. वाचा

etv-bharat-top-10-news-at-11am
Top १० @ ११ AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर...

By

Published : Jun 14, 2020, 11:00 AM IST

मुंबई - नेपाळच्या खालच्या सभागृहाने नव्या सुधारित राजकीय आणि प्रशासकीय नकाशामध्ये दुरुस्तीला मान्यता दिली आहे. या नकाशात भारतातील काही प्रदेशांचा समावेश आहे... उच्च न्यायालयाने राज्य शासनाला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कोविड १९ चाचणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्याचे आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या प्रयोगशाळा उभारण्याचे आदेश दिले आहेत... विलेपार्ले अग्निशमन केंद्रातील एका जवानाचा सेव्हन हिल रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...

  • काठमांडू - नेपाळच्या खालच्या सभागृहाने नव्या सुधारित राजकीय आणि प्रशासकीय नकाशामध्ये दुरुस्तीला मान्यता दिली आहे. या नकाशात भारतातील काही प्रदेशांचा समावेश आहे. दोन तृतीयांश बहुमताने खालच्या सभागृहाने या नव्या नकाशाला संमती दिली आहे.

सविस्तर वाचा -नेपाळच्या संसदेची नव्या नकाशाला मंजुरी, भारतातील प्रदेशांचा समावेश

  • रत्नागिरी -रत्नागिरीतील कोरोना टेस्ट लॅबच्या संदर्भात खलिल वस्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वस्ता यांच्यावतीने रत्नागिरीचे अ‌ॅड. राकेश भाटकर यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद केला. या याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य शासनाला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कोविड १९ चाचणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्याचे आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या प्रयोगशाळा उभारण्याचे आदेश दिले आहेत.

सविस्तर वाचा -राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोविड चाचणी प्रयोगशाळा उभारा; उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

  • अमरावती- पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी कपाशीचे बनावट बियाणं विक्री करणाऱ्या एका कृषी केंद्र संचालकासह दोन आरोपींना अटक केली होती. या तपासात मुख्य आरोपी रामेश्वर चांडक हा त्याच्या शेतात बनावट कपाशीचे बियाणं तयार करत असल्याचे समोर आले. तेव्हा पोलिसांनी चांडक यांच्या शेतातील कारखान्यावर छापा टाकला. यात बियाणे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस आणि कृषी विभागाने संयुक्तरित्या केली.

सविस्तर वाचा -बनावट बियाणे प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या कारखान्यावर छापा, शेतातच बियाण्यांची निर्मिती

  • मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरणाचे काम अग्निशमन दलाकडून केले जात आहे. यामुळे अग्निशमन दलातील 91 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विलेपार्ले अग्निशमन केंद्रातील एका जवानाचा सेव्हन हिल रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे अग्निशमन दलातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा आठवर पोहोचला आहे.

सविस्तर वाचा -आठवा बळी... कोरोनामुळे मुंबई अग्निशमन दलातील आणखी एका जवानाचा मृत्यू

  • पुणे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात अंतिम वर्षाच्या परीक्षेसंबंधीच्या भूमिकेमध्ये विसंगती आहेत. यावर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मत व्यक्त केले. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत, या मताचा मी आहे. पण, तातडीने परीक्षा घ्याव्यात या मताचा नाही, असे ते म्हणाले.

सविस्तर वाचा -अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत पण... वाचा काय म्हणाले केंद्रीय मंत्री रामदास आठवले

  • पुणे - गेल्या आठवड्यात पिंपळे सौदागर येथे प्रेम प्रकरणातून विराज विलास जगताप या वीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सहा आरोपी अटकेत आहेत. मात्र, या प्रकरणातील मुलीलादेखील आरोपी करण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

सविस्तर वाचा -'विराज'च्या हत्येप्रकरणी संबंधित मुलीलाही आरोपी करावं; केंद्रीय मंत्र्यांची मागणी..

  • हैदराबाद : कोरोना महामारी, आणि भारत-चीन सीमेवरील तणाव पाहता, जनतेमध्ये चीनविरोधाची लाट पसरली आहे. समाजमाध्यमांमध्ये चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत. मात्र, आपण खरंच चिनी वस्तूंपासून वेगळे होऊ शकतो का..?

सविस्तर वाचा -चिनी वस्तूंचा वापर टाळणे खरंच शक्य आहे का?

  • मुंबई - चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांच्यासह महिला क्रिकेटपटू स्मृती मानधाना आणि दिप्ती शर्मा यांना थांबण्याच्या ठावठिकाणाची माहिती न पुरविल्यामुळे राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीतर्फे (नाडा) नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, बीसीसीआयने उशीर होण्यासाठी 'पासवर्डमध्ये गडबड' झाल्याचा हवाला दिला आहे.

सविस्तर वाचा -डोपिंगविरोधी 'नाडा'ची पुजारा, स्मृती मानधानासह ५ क्रिकेटपटूंना नोटीस

  • वाशिम- कारंजा तालुक्यातील ग्राम वापटी कुपटी येथील एक इसम पुलावरुन वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. सदरहू व्यक्तीची दुचाकी ही एक किलोमीटर दूर खोलीकरणात सापडली असल्याने ही भीती बळावली आहे. गाळ मोठ्या प्रमाणावर असल्याने, तसेच या पात्रात झाडे व झुडपेही भरपूर असल्याने शोध मोहीमेमध्ये अडचणी येत आहेत. तर सदरहू व्यक्ती आज न सापडल्याने, उद्या पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा -धक्कादायक; वापटी-कुपटीतील व्यक्ती नाल्यात गेला वाहून..

  • मुंबई - शहरात कोरोनाचे नवे 1 हजार 383 रुग्ण आढळून आले असून 69 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 56 हजार 740 वर तर मृतांचा आकडा 2 हजार 111 वर पोहचला आहे. मुंबईमधून आतापार्यंत 25 हजार 947 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 28 हजार 682 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

सविस्तर वाचा -मुंबईत 1383 नवे कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या दुपटीचा वेग मंदावला

देशभरातील कोरोना अपडेट आणि बातम्या :देशभरातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर..

ABOUT THE AUTHOR

...view details