भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा सह पाच जणांना यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे... राज्यात आज १४ हजार १६१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहेत... राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 5 पोलिसांचा मृत्यू तर 303 पोलीस कोरोनाग्रस्त झाले आहेत... जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वादरम्यान शहरातील तीन मंदिरे भक्तांसाठी खुले करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे... सिल्वर ओक नंतर शरद पवारांच्या गोविंद बागेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे...
- नवी दिल्ली -भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, पॅरा अॅथलीट मारियाप्पन थांगावेलु आणि टेबल टेनिसपटू मनिका बत्रा यांना यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने निवड समितीच्या शिफारशीस मान्यता दिली असून देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच संयुक्तपणे पाच खेळाडूंची निवड झाली आहे.
सविस्तर वाचा -रोहितसह पाच जणांना खेलरत्न, तर वेगवान गोलंदाज इशांत शर्माला अर्जुन पुरस्कार
- मुंबई-राज्यात आज (शुक्रवार) ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के इतके आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ७० हजार ८७३ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार १६१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून राज्यात सध्या १ लाख ५६४ हजार ५६२ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा -महाराष्ट्रात दिवसभरात १४ हजार १६१ नवे कोरोना रुग्ण, ३३९ रुग्णांचा मृत्यू
- नवी दिल्ली : जेईई (मेन्स) आणि नीट (यूजी) या प्रवेश परीक्षांची तारीख पुढे न ढकलण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) घेतला आहे. त्यानुसार, जेईई मेन्स ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर; तर नीट (यूजी) ही परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे.
सविस्तर वाचा -JEE-NEET परीक्षा पुढे ढकलणार नाही; 'एनटीए'ने जाहीर केल्या तारखा..
- बारामती (पुणे)-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थान असणाऱ्या गोविंद बागेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गोविंद बाग येथील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. आज दुपारी चौघांचे कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. चार जणांमध्ये तीन पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे. शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक येथेही कोरोनाने शिरकाव केला होता.
सविस्तर वाचा -सिल्वर ओक नंतर शरद पवारांच्या गोविंद बागेतही कोरोनाचा शिरकाव; 4 जणांना संसर्ग
- मुंबई -राज्यात कोरोना व्हायरस संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान लॉकडाऊन, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात राज्यभरात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. कर्तव्य बजावताना गेल्या 24 तासात 303 पोलीस कोरोनाबाधित झाले असून, 5 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 136 पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 12 पोलीस अधिकारी तसेच 122 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.