महाराष्ट्रात बुधवारी कोरोनाचे १२ हजार ७१२ नवीन रुग्ण आढळले आहेत... पार्थ पवार यांनी राम मंदिर आणि सुशांतसिंह प्रकरणात केलेल्या विधानाचे राष्ट्रवादीत पक्षांतर्गत तीव्र पडसाद उमटले आहेत... राज्यात कोरोना चाचणींसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून ते प्रति चाचणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहेत... 'भारतीय रेल्वे भवन सेवा केंद्र'च्या नावाखाली देशभरातील लाखो तरुणांना कोट्यवधींचा चुना लावला जात असल्याचा प्रकार ई टीव्ही भारतने समोर आणला आहे...
- मुंबई - राज्यात बुधवारी पुन्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. १२ हजार ७१२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.६४ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४७ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा -दिलासादायक : राज्यात आतापर्यंतचे सर्वोच्च 13 हजार 408 रुग्ण कोरोनामुक्त
- मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राम मंदिर आणि सुशांतसिंह प्रकरणात केलेल्या विधानाचे राष्ट्रवादीत पक्षांतर्गत तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यासाठी आज (गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत तातडीची बैठक घेऊन पार्थ पवारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत पार्थ पवार यांच्या विषयावर सर्वाधिक चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.
सविस्तर वाचा -सिल्व्हर ओक : पार्थ पवारांच्या भूमिकेवर शरद पवारांची नाराजी
- मुंबई- राज्यात कोरोना चाचणींसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून ते प्रति चाचणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे, आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १ हजार ९००, २ हजार २०० आणि २ हजार ५०० रुपये, असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
सविस्तर वाचा -राज्यातील कोरोना चाचणी दरात तिसऱ्यांदा सुधारणा; प्रति तपासणी ३०० रुपयांची कपात
- नवी दिल्ली -काँग्रेस नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी(५०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज(बुधवार) निधन झाले. त्यागी यांची प्रकृती उत्तम होती. त्यांना कोणताही त्रास नव्हता. मात्र, आज हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचे निधन झाले. राजीव त्यागी माध्यमांमधील एक प्रमुख चेहरा होते. अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभाग घेत असत. नुकतेच एका टीव्ही चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला होता.
सविस्तर वाचा -काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
- मुंबई -मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हेच वाईट राजकारण आहे. पुराव्याशिवाय आरोप करणे म्हणजे मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, अशा शब्दात मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.