राज्यात आज(शुक्रवार) कोरोनाच्या १० हजार ४८३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे... एअर इंडियाच्या एक्सप्रेस विमानाला केरळमध्ये अपघात झाला असून आतापर्यंत या अपघातात वैमानिकासह चौदा जणांचा मृत्यू झाला आहे... 2021 साली होणारी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे... पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) कोरोनाच्या लसींचे 10 कोटी डोस तयार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे...
- केरळ - एअर इंडियाच्या एक्सप्रेस विमानाला केरळमध्ये अपघात झाला आहे. विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाला अपघात झाला असून अपघातावेळी विमानात 191 प्रवासी प्रवास करत होते. प्राप्त माहितीनुसार मुख्य पायलटसह चौदा जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप बचाव कार्य सुरू आहे.
सविस्तर वाचा -केरळ विमान दुर्घटना: एअर इंडियाच्या वैमानिकासह 14 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून शोक
- मुंबई :राज्यात आज(शुक्रवार) नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून आज देखील १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, १० हजार ४८३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६६.७६ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख २७ हजार २८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४५ हजार ५८२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा -राज्यात नवीन रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या जास्त; आज 10 हजार 906 रुग्ण कोरोनामुक्त
- तिरुवनंतपुरम- आज रात्री केरळमधील कोझीकोड धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. कोझीकोडमधील करीपूर विमानतळावर हा अपघात झाला. यात एका पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यातील मुख्य पायलट हा मुंबईतील असून, कमांडर कॅप्टन दिपक साठे असे त्या पायलटचे नाव आहे.
सविस्तर वाचा -एअर इंडिया विमान दुर्घटना: वैमानिक दिपक साठेंचा मृत्यू
- मुंबई -६ मार्चला टायगर श्रॉफचा ‘बागी ३’ रिलीज झाला आणि अपेक्षेप्रमाणे पहिल्या आठवड्यातच त्याने १०० कोटींना गवसणी घातली, मात्र तोपर्यंत बॉलिवूडमध्ये कुणालाही पुढे नक्की काय वाढून ठेवलं आहे याची कदाचित कल्पना नसावी. पुढच्या तीन आठवड्यात तो किती कोटींना गवसणी घालणार याची चर्चा सुरू असतानाच, २६ मार्चला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि हा लॉकडाऊन १५-१५ दिवस करत मारूतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच गेला. भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांना याचा फटका बसला त्यामुळे संपूर्ण जगच जणू लॉक झालं आहे अशी परिस्थिती निर्माण झाली.
सविस्तर वाचा -ईटीव्ही भारत स्पेशल : लॉकडाऊनमुळं बॉलिवूडचं जवळपास तीन हजार कोटींचं नुकसान!
- हैदराबाद - आयसीसी बोर्डाची आज (शुक्रवार) बैठक पार पडली असून यात टी-20 विश्वचषक स्पर्धेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, 2021 साली होणारी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. तर, 2022 साली होणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा हा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे.