महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या - महाराष्ट्र कोरोना न्यूज

राज्यासह देश-विदेशातील रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर..

Etv Bharat top 10 news at 11 PM
रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

By

Published : Jul 22, 2020, 9:11 AM IST

Updated : Jul 23, 2020, 12:12 AM IST

हैदराबाद - राज्यात आज (बुधवार) २८०0 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाली आहे... एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे त्यावर आवश्यक असलेल्या इंजेक्शन आणि गोळ्यांचा तुटवडा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतत आहे... तिहेरी तलाक विरोधात कायदा मंजूर झाल्यानंतर तिहेरी तलाकच्या घटना कमी झाल्याचे मंत्री अब्दुल मुख्तार नक्वी यांनी म्हटले आहे... भारतीय रेल्वेने मालवाहू सेवेच्या बाजारपेठेत हिस्सा वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे... यासह वाचा महत्वाच्या घडामोडी...

  • मुंबई- देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढतच आह. महाराष्ट्रात तर आज (बुधवार) एकदिवसातील सर्वोच्च कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात आज ५ हजार ५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ८७ हजार ७६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या १० हजार ५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सविस्तर वाचा -एकदिवसीय उच्चांक! राज्यात तब्बल १० हजार ५७६ कोरोना रुग्णांची नोंद, २८० मृत्यू

  • पुणे - सात ते आठ दवाखाने फिरल्यानंतरही बेड उपलब्ध न झाल्यामुळे धायरीतील एका रुग्णाने मंगळवारी रात्री कुटुंब आणि मित्रांसह अलका चौकात ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यानंतर या रुग्णाला विश्रांतवाडीतील एका रुग्णालयात अ‌ॅडमिट करण्यात आलं होतं. परंतू, त्या रुग्णाचा आज (बुधुवार) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सविस्तर वाचा -उपचारासाठी आंदोलन करणाऱ्या पुण्यातील 'त्या' कोरोनाबाधित रुग्णाचा अखेर मृत्यू..

  • ठाणे - एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे त्यावर आवश्यक असलेल्या इंजेक्शन आणि गोळ्यांचा तुटवडा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. अनेक कोरोना रुग्णांचे नातेवाईक है औषध मिळवण्यासाठी वणवण भटकत आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोरोनावर उपचार करणारी रुग्णालये फक्त या टॉसिलिझिम ४०० एमजी आणि रेमडेसिवीर १०० एमजी औषधं मिळण्यासाठी प्रिस्क्रिप्शन लिहून देत आहेत. त्यामुळे हे इंजेक्शन आणण्यासाठी नातेवाईकांना भटकावे लागत आहे. सरकारने कोरोनाबाधित रुग्णांचे आधार कार्ड या औषधांसाठी सक्तीचे केले असले तरीही हा सुरू असलेला काळाबाजार रोखण्यासाठी सरकारला अपयश आले आहे.

सविस्तर वाचा -स्पेशल रिपोर्ट; आधार कार्ड सक्ती असूनही होतोय 'रेमडेसिवीर'चा काळाबाजार

  • उस्मानाबाद -कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात स्वॅब टेस्टींगची लॅब लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे आता उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात उभारण्यात आलेल्या कोविड 19 टेस्टींग लॅबला आयसीएमआरने मान्यता दिली आहे. आजपासून या लॅबमध्ये स्वॅब टेस्टींगचे काम सुरू होत आहे पाहा कसे चालते स्वॅब टेस्टींग लॅबमध्ये काम...

सविस्तर वाचा -कोरोना स्वॅब टेस्टींग लॅबमध्ये कसे चालते काम...पाहा विशेष रिपोर्ट

  • नवी दिल्ली - तिहेरी तलाक विरोधात 1 ऑगस्ट 2019 रोजी कायदा मंजूर करण्यात आला. तेव्हापासून देशात 82 टक्के तिहेरी तलाकच्या घटना कमी झाल्याचे अल्पसंख्यंक मंत्री अब्दुल मुख्तार नक्वी यांनी म्हटले आहे. ज्या दिवशी कायदा लागू झाला तो दिवस म्हणजे 1 ऑगस्ट हा मुस्लिम महिला हक्क दिवस असल्याचे ते म्हणाले.

सविस्तर वाचा -कायदा आल्यानंतर तिहेरी तलाकची 82 टक्के प्रकरणं घटली - अल्पसंख्यांक मंत्री

  • अमरावती -ग्रामीण भागातील श्रीमंत असो व गरीब ज्या शेतकऱ्यांकडे शेतमाल साठवण क्षमता नाही अशा सर्व शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीने जिल्ह्याच्या विविध भागात गोदाम उभारण्यात आले आहेत. वास्तवात या गोदामात शेतकऱ्यांनी मेहनतीने घेतलेल्या शेतमालाऐवजी त्यांच्याकडून अल्प दारात शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचाच माल अधिक असतो. वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला गोदाम उपलब्ध होत नाही. या गोदामात शेतमालाची साठवणूक करणारे व्यापरी मात्र मालामाल होत असल्याचे दुर्दैवी वास्तव अमरावती जिल्ह्यात आहे.

सविस्तर वाचा -शेतकऱ्यांसाठीच्या गोदामात व्यापाऱ्यांचा माल, जागेअभावी मातीमोल विकावा लागतोय शेतमाल

  • हैदराबाद – भारतीय रेल्वेने मालवाहू सेवेच्या बाजारपेठेत हिस्सा वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दक्षिण केंद्रीय रेल्वे (एससीआर) 5 ऑगस्टपासून पहिली मालवाहू एक्सप्रेस रेल्वे हैदराबाद ते नवी दिल्ली सुरू करमार आहे..

सविस्तर वाचा -रेल्वेचा उत्पन्नाचा नवा मार्ग; दिल्ली-हैदराबाद धावणार पहिली मालवाहू एक्सप्रेस

  • इस्लामाबाद -भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या खटल्यात कौन्सिलर नेमण्यासाठी पाकिस्तानी सरकारने इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कुलभूषण प्रकरणी प्रामाणिकपणे खटला चालविण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले होते. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पाकिस्तानने याचिका दाखल केली आहे.

सविस्तर वाचा -कुलभूषण जाधव खटला: शिक्षेच्या पुनर्विचारासाठी पाक सरकारची इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका

  • मुंबई -आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. शिवाय महाराष्ट्रासाठी अधिक समर्पित होऊन काम करण्याचे बळ मिळाले अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले.

सविस्तर वाचा -सर्वांच्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत, अधिक समर्पित होऊन काम करण्याचे मिळाले बळ'

  • मुंबई -शासकीय अधिकाऱ्यांनी कोणत्या बैठकीला उपस्थित राहावे, याबाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाने फडणवीस सरकारच्याच निर्णयाची आणि इच्छेची पूर्ती केली आहे. त्यामुळे आता भाजपाच्या नेत्यांना व विरोधी पक्ष नेत्यांना पोटशूळ का व्हावा? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

सविस्तर वाचा -सरकारने घेतलेला 'तो' निर्णय फडणवीसांची इच्छापूर्ती करणारा - सचिन सावंत

Last Updated : Jul 23, 2020, 12:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details