हैदराबाद -राज्यात आज (गुरुवार) कोरोनाच्या ८ हजार ६४१ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर मुंबईत आज कोरोनाचे 1 हजार 498 नवे रुग्ण आढळून आले... सीएसएमटी येथील जीपीओ जवळील भानुशाली इमारतीचा अर्धा भाग आज (गुरुवार) सायंकाळी कोसळला... एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले तेलगू कवी वरवरा राव यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे... राजस्थान उच्च न्यायालयाने सचिन पायलट यांच्या याचिकेवरील सुनावणी स्थगित केली आहे...मुंबईमध्ये काम करूनही पगार मिळत नसल्याने केरळचे 40 डॉक्टर माघारी निघाले आहेत... यासह वाचा राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी...
- मुंबई - दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. अशातच आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात आज (शुक्रवार) कोरोनाचा उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे. आज ५ हजार ५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के असून, आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५८ हजार १४० रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, आज कोरोनाच्या ८ हजार ६४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा -दिलासादायक! कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या रुग्णांची संख्या अधिक...
- मुंबई - सीएसएमटी येथील जीपीओ जवळील भानुशाली इमारतीचा अर्धा भाग आज (गुरुवार) सायंकाळी पत्त्यासारखा कोसळला. या इमारतीचा मलबा हटवण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत 2 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल मलाबा हटवत असून त्यात कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
सविस्तर वाचा -मुंबईतील सीएसएमटीजवळील इमारतीचा भाग कोसळला, ढिगाऱ्यातून दोघांची सुटका; बचावकार्य सुरु
- मुंबई - मुंबईत आज कोरोनाचे 1 हजार 498 नवे रुग्ण आढळून आले असून, 56 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 97 हजार 751 वर; तर मृतांचा आकडा 5 हजार 520 वर पोहोचला आहे. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांवर, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 52 दिवसांवर पोहोचला आहे.
सविस्तर वाचा -मुंबईत कोरोनाचे 1 हजार 498 नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 97 हजार 751वर..
- मुंबई - एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले तेलगू कवी वरवरा राव यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तळोजा कारागृहातून उपचारांसाठी त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली. मात्र, कोरोनाची कोणतीही लक्षणे त्यांच्यात दिसत नसून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जेजे रुग्णालयाचे डीन रणजित माणकेश्वर यांनी स्पष्ट केले आहे. वरवरा राव यांना पुढील उपचारांसाठी लवकरच जिटी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.
सविस्तर वाचा -तेलुगू कवी वरवरा राव यांना कोरोनाची लागण
- मुंबई - राज्यात आमचे सरकार स्थिर असून, सरकारला कोणताही धोका नाही. उलट भाजपचे लोक आमच्या संपर्कात असून, ते लोक कोण आहेत, हे कळले तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल, असे भाकीत महिला व बालकल्याण विकासमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी केले. राजस्थाननंतर राज्यातील सरकारही अस्थिर होईल का, यासंदर्भात त्यांना प्रश्न उपस्थित केला असता, त्यांनी हे भाकीत केले.