हैदराबाद -राज्यात आज सोमवार) कोरोनाच्या ६ हजार ४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत... नाशिकमध्ये भरधाव जीपची दुचाकीला धडक बसल्याने मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले... राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे अशक्य असल्याचे सांगितले... सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे... भारतात डिजीटालयझेशन करण्याकरता गुगल भारतात सुमारे 75 हजार कोटींची (10 अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे... यासह वाचा राज्यातील आणि देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी...
- मुंबई :कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस राज्यात वाढत असून राज्यात आज(सोमवार) ४ हजार १८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६ हजार ४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सविस्तर वाचा -राज्यात आज साडेसहा हजार नव्या रुग्णांची भर, १९३ जणांचा मृत्यू
- सोलापुर - एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. अमोल अशोल जगताप (वय 36 वर्ष), मयुरी अमोल जगताप (वय 27 वर्ष), आदित्य अमोल जगताप (वय 5 वर्ष), आयुष अमोल जगताप (वय 3 वर्ष) राहणार हांडे फ्लॅट, जुना पुणे नाका येथील गुरुकृपा बिल्डिंगमध्ये या सर्वांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सविस्तर वाचा -धक्कादायक..! सोलापुरात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
- मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नवे 1 हजार 174 रुग्ण आढळून आले आहेत. तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांवर पोहचल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
सविस्तर वाचा -मुंबईत कोरोनाचे 1,174 नवे रुग्ण; बरे होण्याचा दर 70 टक्के
- मुंबई :अनेक गंभीर कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपयोगी ठरत आहे. मात्र, कोरोनातून बरे झालेले रुग्ण अजूनही म्हणावे तसे प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. अशावेळी यंदाचा गणेशोत्सव 'आरोग्य उत्सव' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेल्या लालबागचा राजा मंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत मंडळाने 137 प्लाझ्मा दात्यांचा शोध घेत त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार केले आहे. आता 1 ऑगस्टपासून हे दाते परळ येथील केईएम रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करणार आहेत. तर, या दात्यांची संख्या आणखी वाढवण्यासाठी मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.
सविस्तर वाचा -अरे वा! लालबागचा राजा मंडळाने शोधले 137 प्लाझ्मा दाते, लवकरच केईएमएमध्ये करणार प्लाझ्मा दान
- नाशिक - शहरातील मातोरी रस्त्याने मखमलाबादकडे जाणाऱ्या शेतमजूरांच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने आलेल्या पीकअप जीपने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, हे चारही जण धडक बसल्यानंतर दूरवर फेकले गेले होते. या धडकेत तीन वर्षाच्या मुलासह त्याचे आई-वडील आणि दुचाकीचालक असे चारजण जागीच ठार झाले आहेत. अपघातानंतर जीप चालक गाडी सोडून फरार झाला आहे.