महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या - cm uddhav thcakeray latest news

राज्यासह देश-विदेशातील रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

etv bharat top 10 news at 11 pm
ईटीव्ही भारत रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

By

Published : Jul 8, 2020, 9:14 AM IST

Updated : Jul 8, 2020, 10:59 PM IST

हैदराबाद -आज (बुधवार) राज्यात कोरोनाच्या ६६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर सध्या राज्यात ९१ हजार ६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत... नागपूर शहरातील मानकापूर येथील प्रसिद्ध ॲलेक्सिस रुग्णालयामध्ये अपात्र डॉक्टरांकडून सोनोग्राफी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी दौरा करत असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला आहे... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'ला कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे.. तिबेट मुद्द्यावरून चीनने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या व्हिसावर निर्बंध लादल्याचे वृत चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिले आहे... यासह वाचा महत्वाच्या घडामोडी...

मुंबई- राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. राज्यात आज कोरोनाच्या ४६३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यत एकूण संख्या १ लाख २३ हजार १९२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ५५.०६ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ९१ हजार ६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज १९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२२ टक्के एवढा आहे.

सविस्तर वाचा -राज्यात 6 हजार 603 नवे कोरोनाबाधित, 198 मृत्यू

नागपूर : शहरातील मानकापूर येथील प्रसिद्ध ॲलेक्सिस रुग्णालयामध्ये अपात्र डॉक्टरांकडून सोनोग्राफी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे, गर्भधारणापूर्व आणि प्रसव पूर्व निदान तंत्रे (लिंग निवड प्रतिबंधक) अधिनियम (पीसीपीएनडीटी) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या रुग्णालयावर कारवाई करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा -अपात्र डॉक्टरांकडून सुरू होता सोनोग्राफी मशीनचा वापर; अ‌ॅलेक्सिस रुग्णालयावर कारवाई..

उस्मानाबाद : जिल्ह्यात एका वासनांध भोंदू महाराजाने भक्तावर बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामुळे, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर भोंदू महाराज पळून जात असतांना इटकळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दिगंबर नामदेव गिरी असे या भोंदू महाराजाचे नाव आहे.

सविस्तर वाचा -घृणास्पद! उस्मानाबादेत वासनांध महाराजाचा भक्तावर अनैसर्गिक अत्याचार

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी दौरा करत असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला. ही घटना आज (बुधवारी) रात्री साडेसात ते आठच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही.

सविस्तर वाचा -देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही..

मुंबई :एका बाजूला राज्याचा कोरोनाशी लढा सुरू असताना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन 2020-21 साठी 7 हजार कोटी रुपये निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या निधीतून यापूर्वी वितरीत केलेला निधी वगळता 1 हजार 306 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास आज शासनाने मान्यता दिली आहे. आतापर्यंत राज्यातील 25.77 लाख खातेदारांना 16 हजार 690 कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

सविस्तर वाचा -राज्यातील 25.77 लाख खातेदारांना 16 हजार 690 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ

बीजिंग -तिबेट मुद्द्यावरून चीनने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या व्हिसावर निर्बंध लादल्याचे वृत चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिले आहे. अमेरिकेने 'रेसिप्रोकल अ‌ॅक्सेस ऑफ तिबेट' कायद्यानुसार काही चिनी अधिकाऱ्यांच्या व्हिसावर निर्बंध घातल्यानंतर आता चीननेही अमेरिकेच्या या कृतीला प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेचे नागरिक, राजनैतिक अधिकारी, पत्रकार आणि पर्यटकांना चीन तिबेटमध्ये जाऊ देत नसल्याची अमेरिकेची अनेक दिवसांपासूनची ओरड आहे.

सविस्तर वाचा -तिबेट मुद्द्यावरून चीनने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांवर व्हिसा निर्बंध लादले

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी मंगळवारी संध्याकाळी अज्ञातांनी तोडफोड केली. राजगृह या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा आणि झाडांच्या कुंड्या यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान राजगृह येथे असणाऱ्या सीसीटीव्ही क‌ॅमेरातील फुटेज पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. त्यातून या प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने होणार आहे.

सविस्तर वाचा -'राजगृह'वर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात; पाहा व्हिडिओ

नागपूर -देशभरात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनामुळे घरात असलेले सर्वसामान्य नागरिक आता मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले आहेत. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत, तर दुसरीकडे तीन महिने घरातच कोंडून राहिल्याने अनेकांचे वजन वाढले आहे. तसेच काहींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता नागरिक कुठल्याही गाडीचा वापर न करता थेट सायकलाचा प्रवास करणे पसंत करत आहेत. त्यामुळे सायकलची मागणी प्रचंड वाढली आहे.

सविस्तर वाचा -लॉकडाऊनंतर व्यायामासाठी सायकलचा वापर, प्रत्येक दुकानातून दिवसाला २५ ते ३० सायकलची विक्री

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृह'ला कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे. याबाबतची मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांनी मागणी केली, ती मागणी तातडीनं मंजूर झाल्याची माहिती जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

सविस्तर वाचा -'राजगृह'ला आता पोलिसांचा खडा पहारा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

ठाणे - कोरोना रुग्णांची महापालिका थट्टा करत असून त्यांच्याशी क्रूरपणे वागत असल्याची टीका भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. ठाण्यातील दोन्ही कॅबिनेट मंत्री सत्तेत मश्गूल असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. कोरोना रुग्णांची महापालिका थट्टा करत असून त्यांच्याशी क्रूरपणे वागत असल्याची टीका भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था पुरेशी नसताना 1000 बेड्सचे हॉस्पिटल सुरू करण्याचा अट्टाहास का केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच कोरोनाबाधित कुटुंबीयांच्या भावनांशी खेळणाऱ्या हॉस्पिटल व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी केली.

सविस्तर वाचा -'ठाण्यातील दोन्ही मंत्री सत्तेत मश्गूल', त्यामुळेच रुग्णांची थट्टा!

Last Updated : Jul 8, 2020, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details