हैदराबाद -राज्यातआज (सोमवार) कोरोनाच्या ५ हजार ३६८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच सध्या राज्यात ८७ हजार ६८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली... नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना भारत सरकारच्या राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे... केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार हे आरक्षण विरोधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (सोमवार) अकोला येथे केला... सारथी संदर्भात जे आरोप केले जात आहेत, ते चुकीचे असून यासंदर्भात राजकारण केलं जातं असल्याचा आरोप मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे... राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज (सोमवार) मातोश्री येथे बैठक झाली... यासह राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या दहा घडामोडी वाचा एका क्लिकवर...
मुंबई - गेली चार दिवस सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी राज्यात चार दिवसांपासून दररोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने केवळ चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे झाले आहेत. आज ३५२२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख १५ हजार २६२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.३७ टक्के एवढे आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत, आज कोरोनाच्या ५ हजार ३६८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ८७ हजार ६८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर -राज्यात 5 हजार 368 नवे कोरोनाबाधित; तर 204 मृत्यू
नवी दिल्ली : कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध राज्यात विद्यापीठ आणि त्याअंतर्गत असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता, परंतु त्यावर आज केंद्रीय गृह मंत्रालयाने तोडगा काढला आहे. देशातील विद्यापीठ आणि खाजगी संस्थांना आपल्या सर्व अंतिम परीक्षा घेण्यासाठीची परवानगी देण्यासाठी आज गृहमंत्रालयाने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिवांना एक पत्र लिहून ही माहिती दिली आहे. या परीक्षा सोबतच देशभरामध्ये उच्च शिक्षणाचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्यासंदर्भात सुद्धा केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाच्या सचिवांना सूचना देण्यात आल्या आहेत.
सविस्तर वाचा -अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी..
ठाणे- मुंबईतील पोलीस उपायुक्त बदल्यांच्या गोंधळात राज्य सरकारमधील समन्वयाच्या अभावाबरोबरच मुख्यमंत्री-मंत्र्यांमधील अविश्वास उघड झाला. राज्य सरकारमधील प्रत्येक जण मीच प्रमुख असल्याच्या अविर्भावात असून, सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.
सविस्तर वाचा - प्रत्येकाला वाटते सरकारमध्ये मीच प्रमुख; देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका
नागपूर- महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना भारत सरकारच्या राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या महिला सेक्रेटरींनी महिला आयोगाकडे तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तक्रार केली होती. मुंढे यांनी अपमानजनक वागणूक आणि मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यावरून महिला आयोगाने मुंढे यांना नोटीस बजावत 7 दिवसांमध्ये आपली भूमिका मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
सविस्तर वाचा -महिलेच्या तक्रारींवरून मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस
अकोला - केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार हे आरक्षण विरोधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (सोमवार) अकोला येथे केला. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याबाबत अधिक बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी, 'आरक्षण पूर्णपणे संपवण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. त्यांच्या धोरणामुळे 11 हजार ओबीसी विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहिले आहेत' असे म्हटले आहे.