मुंबई -राज्यात आज (शनिवार) कोरोनाच्या ५ हजार ३१८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे... महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूसह 8 राज्यांमध्ये देशातील एकूण रुग्णांपैकी 85.5 टक्के अॅक्टिव्ह कोरोनाचे रुग्ण... योगगुरू रामदेव बाबासह पतंजलीचे सीईओ आचार्य बाळकृष्ण आणि इतर तीन जणांवर जयपूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल... डेक्सामेथासोन या अल्पदरातील आणि मोठ्या प्रमाणात स्टेरॉईड म्हणून वापर होणाऱ्या औषधाचा वापर आता कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना होणार... यासह वाचा राज्यातील, देशातील आणि जगभरातील महत्वाच्या घडामोडी.
- मुंबई - दिवसेंदिवस देशासह राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. राज्यात आज (शनिवार) कोरोनाच्या ५ हजार ३१८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ६७ हजार ६०० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज ४ हजार ४३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, एकूण संख्या ८४ हजार २४५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९४ टक्के एवढे झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा - CORONA UPDATE : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजारांच्या वर, १६७ रुग्णांचा मृत्यू
- नवी दिल्ली -महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूसह 8 राज्यांमध्ये देशातील एकूण रुग्णांपैकी 85.5 टक्के अॅक्टिव्ह कोरोनाचे रुग्ण आहेत. तर या आठ राज्यांमध्ये देशातील एकूण मृत्यूंपैकी 87 टक्के मृत्यू झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालायने दिली. ही माहिती आरोग्य मंत्रालयाने कोरोना संबधी काम पाहणाऱ्या मंत्रीगटाकडे पाठवली असून देशात दिवसाला 3 लाखांपर्यंत कोरोनाच्या चाचण्या घेण्याची क्षमता निर्माण करण्याची तयारी करण्यात यावी, असे म्हटले आहे.
सविस्तर वाचा - 'या' आठ राज्यांत कोरोनाचे 85 टक्के अॅक्टिव्ह रुग्ण, तर 87 टक्के मृत्यू
- मुंबई- जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नवे 1460 रुग्ण आढळून आले असून 105 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 73747 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 4282 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज एकाच दिवशी 2587 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापार्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 42331 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 27134 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
सविस्तर वाचा -मुंबईत आज 2587 रुग्णांची कोरोनावर मात, आढळले 1460 नवे रुग्ण, 105 जणांचा मृत्यू
- नवी दिल्ली - डेक्सामेथासोन या अल्पदरातील आणि मोठ्या प्रमाणात स्टेरॉईड म्हणून वापर होणाऱ्या औषधाचा वापर आता कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना होणार आहे. कोरोना उपचार नियमावलीत(प्रोटोकॉल) या औषधाचा समावेश करण्यात आला आहे. सामान्य लक्षणे ते तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर डेक्सामेथासोन वापरण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा -चांगली बातमी.. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी 'डेक्सामेथासोन' औषध वापरास परवानगी
- अमृतसर -कोरोना विषाणूच्या फैलावामुळे पाकिस्तानात अडकलेले 208 भारतीय नागरिक चार महिन्यानंतर मायदेशी परतले आहेत. दोन्ही देशातील अटारी वाघा सीमेवरून नागरीक भारतात परतले. मागील दोन दिवासांपासून पाकिस्तानात अडकलेल्यांना माघारी आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. मागील चार महिन्यांपासून अनेक भारतीय पाकिस्तानात अडकल्याची माहिती पोलीस अधिकारी अरुणपाल सिंह यांनी दिली. 25 जूनला 204 तर 26 जूनला 217 नागरिकांना माघारी आणण्यात आले. तर आज 208 नागरिक मायदेशी परतले, असे सिंह यांनी सांगितले