चेन्नई– राज्य सरकारांना कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यास मदत करण्यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाणा राज्याचा दौरा करणार आहे... बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने तब्बल 83 जणांचा जीव गेला आहे... गलवान व्हॅली भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धुमश्चक्री झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे... देशभरात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन या वर्षांच्या अखेरपर्यंत आयआयटी मुंबईत वर्गातील प्रत्यक्ष शिकवण्या होणार नाहीत, असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे... यासह जगातील, देशातील आणि राज्यातील इतर महत्वाच्या टॉप 10 बातम्या वाचा...
- पाटना -उत्तर भारतामध्ये आज(गुरुवार) ढगांच्या गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने तब्बल 83 जणांचा जीव गेला आहे. तर उत्तरप्रदेश राज्यात 25 जण दगावले आहेत. बिहारमधील गोपालगंज या एकाच जिल्ह्यात 13 जण वज्रघाताचे शिकार झाले आहेत. देशावर कोरोना संकट असतानाच नैसर्गिक संकटानेही उत्तर भारतावर शोककळा पसरली आहे
सविस्तर वाचा -बिहारमध्ये वीज कोसळून 83 जणांचा मृत्यू, उत्तरप्रदेशात 25 दगावले..
- नवी दिल्ली - गलवान व्हॅली भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धुमश्चक्री झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तणाव निवळण्यासाठी 22 जूनला वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर चीनचे सैन्य आणि वाहनांचा ताफा काही प्रमाणात सीमेवरून मागे घेतला आहे. सीमेवर चीनने मोठ्या प्रमाणात वाहनेही आणून ठेवली होती. मात्र, ती आता मागे घेण्यात आली आहे.
सविस्तर वाचा -गलवान व्हॅलीतून चीनचे काही सैन्य आणि वाहनांचा ताफा मागे सरकला
- नवी दिल्ली - राज्य सरकारांना कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यास मदत करण्यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाणा राज्याचा दौरा करणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल या पथकाचे नेतृत्त्व करणार आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा या पथकाकडून घेण्यात येणार असून राज्यांना उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.
सविस्तर वाचा -कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक 'या' राज्यांना देणार भेटी
- मुंबई - आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय आज (गुरुवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. आशा स्वयंसेविकांना दरमहा कमाल 2 हजार रुपयापर्यंत, तर गट प्रवर्तकांना 3 हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येतील. यासाठी 170 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. 1 जुलैपासून ही वाढ लागू होईल. सध्या राज्यात ग्रामीण आणि नागरी भागात 65 हजार 740 आशा स्वयंसेविकांची पदे भरलेली आहेत.
सविस्तर वाचा -आशा सेविकांच्या मानधनात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीतील इतरही महत्त्वाचे निर्णय पाहा...
- मुंबई- देशभरात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन या वर्षांच्या अखेरपर्यंत आयआयटी मुंबईत वर्गातील प्रत्यक्ष शिकवण्या होणार नाहीत, असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीची माहिती आयआयटी मुंबईचे संचालक सुभाशिष चौधरी यांनी सोशल माध्यमावर एक पोस्ट शेअर करुन दिली आहे.