मुंबई -राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे... बाबा रामेदव यांनी कोरोनावरील कथित उपचारासाठी तयार केलेले 'कोरोनील' वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे... राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने आज एकाच दिवशी ४ हजार १६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे... नागपूर जिलह्यात शेतजमिनीच्या वादातून सावकाराची पत्नी आणि कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्नीमध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानंतर झटापट झाल्याचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे... पाकिस्तानच्या कराचीत विमान अपघातात 97 जणांना मृत्यू झाला आहे... शरद पवार म्हणजे राज्याला झालेला 'कोरोना' असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकरांची खरमरीत टीका, यासह देशातील आणि राज्यातील इतर महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- मुंबई - राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जूनला सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील.
सविस्तर वाचा -राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची निुयक्ती
- पिथोरागड -नेपाळने भारतीय हद्दीतील भूप्रदेशावर नुकताच दावा केला आहे. तसा त्यांच्या नकाशात बदलही केला आहे. राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी नकाशा दुरुस्ती विधेयकावर सही केली असून त्याचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी नेपाळी सैनिक भारतीय हद्दीतील भूप्रदेशावर हेलिकॉप्टर तळ (पॅड) उभारताना दिसून आले. या ठिकाणी सैनिकांकडून लष्करी छावणीही उभारण्यात येत आहे.
सविस्तर वाचा -भारताच्या हद्दीत नेपाळच्या लष्कराकडून हेलिकॉप्टर तळाची उभारणी
- मुंबई– पतंजली आयुर्वेदिक कंपनीच्या माध्यमातून कोरोनावरील औषध तयार करण्याचा दावा योगगुरू बाबा रामदेव यांना चांगल्याच अडचणीत टाकणारा ठरत आहे. त्या औषधाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच राज्याच्या आयुष टास्क फोर्सने यावर नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर बाबा रामदेवांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी टास्क फोर्सने मागणी केली आहे.
सविस्तर वाचा - बाबा रामदेवांविरोधात गुन्हा दाखल करा! आयुष टास्क फोर्सची मागणी
- मुंबई - राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४ हजार १६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. संबंधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यांत आज ३ हजार ५३० रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा -दिलासा...राज्यातील रिकव्हरी रेट 50 टक्क्यांहून अधिक; आरोग्यमंत्री
- नागपूर - शेतजमिनीच्या वादातून सावकाराची पत्नी आणि कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्नीमध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानंतर झटापट झाल्याचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. ही घटना नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील वाकेश्वर येथील आहे. २०१७ साली कथित सावकार आणि शेतकरी यांच्यातील कर्ज प्रकरणातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. शेतकरी दाम्पत्याने या घटनेची तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी या घटनेत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.