मुंबई -शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची कानउघडणी केली आहे... लडाखच्या गलवान खोऱ्यात वीरमरण आलेले बिहारचे सुनील कुमार यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत... भारतात सलग बाराव्या दिवशी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज (गुरुवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ५३ पैशांची तर डिझेलच्या दरात ६४ पैशांची वाढ करण्यात आली... केंद्र सरकारच्या दुरसंचार विभागाने भारतीय संचार निगम लिमीटेडच्या (बीएसएनएल) 4 जी सुविधा अद्ययावत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिनी साहित्याचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- पाटणा (बिहार) - लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चिनी सैन्यातील हाणामारीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. यात बिहारच्या बिहटा जिल्ह्यातील पैतृक या गावातील सुनील कुमार यांचाही समावेश आहे. त्यांचे पार्थिव आज (दि. 18 जून) त्यांच्या मुळगावी पोहोचले आहे. या ठिकाणी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित आहे. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सविस्तर वाचा -हुतात्मा सुनील कुमार यांच्या पार्थिवावर आज मनेरमध्ये अंत्यसंस्कार
- मुंबई- अमेरिकेसारख्या मस्तवाल महासत्तेलाही न जुमानणार्या चीनची स्वतःची एक जागतिक फळी आहे. चीन साम्राज्यवादी आणि घुसखोर आहे. त्याने भारतावर आधीच अतिक्रमण केले आहे. लडाखच्या हद्दीत घुसून गलवान खोऱ्यात चीनने जो हल्ला केला तो एक इशारा आहे. ‘गडबड सीमेवर नसून दिल्लीत आहे. दिल्लीची सरकारे नामर्द आहेत म्हणून सीमेवर शत्रू अरेरावी करतो’, असे सहा वर्षांपूर्वी जोरकसपणे सांगणारे नरेंद्र मोदी आज दिल्लीचे सर्वसत्ताधीश आहेत. त्यामुळे आज जे घडले, त्याचा प्रतिकार मोदींनाच करावा लागेल. चीनचे पंतप्रधान अहमदाबादला येऊन पंतप्रधान मोदींच्या झोपाळ्यावर ढोकळा खात बसले तेव्हाही याच स्तंभातून आम्ही इशारा दिलाच होता. “चिनी लाल माकडांवर विश्वास ठेवू नका! पंडित नेहरूंचा विश्वासघात झाला तसा तुमचाही होईल.” दुर्दैवाने तो झाला आहे, असे म्हणत शिवनेने मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची कानउघडणी केली.
सविस्तर वाचा -चीनचा हल्ला..! पंतप्रधान जनतेसमोर न येणे धक्कादायक; सामनातून मोदींची कानउघडणी
- मदुराई (तामिळनाडू)- लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चिनी सैन्यातील हाणामारीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. यात तामिळनाडूच्या रामनाथपुरम येथील हवालदार के. पलानी यांचाही समावेश आहे. त्यांचे पार्थिव बुधवारी (दि. 17 जून) तामिळनाडूनच्या मदूराई विमानतळावर दाखल झाले होते. आज (दि. 18 जून) त्यांच्यावर रामनाथपुरम येथे लष्करी इतमामात दफनविधी पार पडला आहे.
सविस्तर वाचा -तामिळनाडूचे हुतात्मा जवान के. पलानी यांच्यावर लष्करी इतमामात झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली - भारतात सलग बाराव्या दिवशी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज (गुरुवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ५३ पैशांची तर डिझेलच्या दरात ६४ पैशांची वाढ करण्यात आली. दिल्लीमध्ये आजचे पेट्रोलचे दर ७७.८१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७६.४३ रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर आहेत. मात्र, स्थानिक बाजारपेठेमध्ये याच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे.
सविस्तर वाचा -महागाईचा भडका..! पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर
- नवी दिल्ली -केंद्र सरकारच्या दुरसंचार विभागाने भारतीय संचार निगम लिमीटेडच्या (बीएसएनएल) 4 जी सुविधा अद्ययावत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिनी साहित्याच वापर न करण्याच निर्णय घेतला आहे. भारत आणि चीनमध्ये गलवान (लडाख प्रदेश) खोऱ्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये भारताचे 20 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारताने चीनची आर्थिक कोंडी करण्याकडे हे पहिले पाऊल टाकले आहे. तसेच देशाच्या सुरक्षेतही चीनकडून छेडछाड करण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.