मुंबई -शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे... जम्मू-काश्मीरच्या शोपियान तुर्कवांगम भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला... देशात मागील २४ तासांत १० हजार ६६७ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह आता एकूण रुग्ण संख्या ३ लाख ४३ हजार ९१ इतकी झाली आहे.... आत्महत्येची रिपोर्टिंग कशी असावी, यासह महत्वाच्या टॉप -१० बातम्या....
- मुंबई- सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरे यांच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहील हे एकदा ठरल्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही. स्वत: शरद पवार यांनी हे पथ्य पाळले आहे. ते मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटत असतात. त्यांचा अनुभव मोठा. त्यानुसार राज्यासंदर्भात ते काही सूचना करतात. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरू आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे, असे म्हणत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.
सविस्तर वाचा -खाट का कुरकुरतेय?, मंत्री चव्हाण अन थोरातांवर सामनातून 'तिरकस बाण'
- श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या शोपियान तुर्कवांगम भागात आज (मंगळवार) सकाळी, भारतीय जवान आणि दहशतवांद्यामध्ये चकमक झाली. यात भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. ही माहिती काश्मीर झोनच्या पोलिसांनी दिली.
सविस्तर वाचा -J&K : शोपियानमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार, गेल्या १७ दिवसात २७ जणांचा खात्मा
- हैदरबाद- रविवारची दुपार उजाडली ती अतिशय दुर्दैवी बातमी घेऊनच. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू झाला. मुंबईच्या पाॅश वसाहतीतल्या फ्लॅटमध्ये त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदनाच्या अहवालात त्याने आत्महत्या केल्याचे निश्चित झाले.
सविस्तर वाचा -आत्महत्येची रिपोर्टिंग कशी असावी; आपण लोकांना आत्महत्येसाठी उद्युक्त तर करत नाही ना?
- नवी दिल्ली -देशात कोरोना विषाणूचा विळखा दिवसागणिक आणखी घट्ट होताना दिसत आहे. लॉकडाउनच्या पाचव्या टप्यात देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत १० हजार ६६७ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह आता एकूण रुग्ण संख्या ३ लाख ४३ हजार ९१ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासांत ३८० रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ९,९०० वर पोहोचली आहे.
सविस्तर वाचा -कोरोना अपडेट : २४ तासात वाढले १० हजार ६६७ नवीन रुग्ण, मोदी आज मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा
- अकोला- देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही हे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिसून आले आहे. तीच गत महाराष्ट्राचीही झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर निर्णय ढकलून मोकळे होतात. आता शाळेबाबतही राज्य शासन निर्णय शाळांवर ढकलून मोकळे झाले, अशा निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला.