हैदराबाद -जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. याशिवाय निसर्ग चक्रीवादळ ३ जूनला महाराष्ट्रातील किनाऱ्यावर धडकणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. तसेच चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सजग असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. वाचा देशभरासह राज्यातील टॉप-१० घडामोडी...
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील दक्षिणेकडील अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांच्या दरम्यान सुरु असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.
वाचा सविस्तर... जम्मू-काश्मीर : जवानांनी एका दहशतवाद्याला घातले कंठस्नान, चकमक सुरू
गुवाहाटी - आसाममधील पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. मात्र, या मान्सूनपूर्व पुराच्या तडाख्यात गेल्या आठवड्यापासून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
वाचा सविस्तर...आसाममध्ये पुरामुळे 3 लाख लोक बाधित, 9 जण ठार
मुंबई- निसर्ग चक्रीवादळ ३ जूनला महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावर धडकणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे निसर्ग वादळाचा तडाखा बसून हानी होऊ नये, याचे नियोजन सरकार करत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.
वाचा सविस्तर... 'निसर्ग' चक्रीवादळ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गृहमंत्री अमित शाहांशी व्हिडिओ कॉन्फरन्सने चर्चा
मुंबई- अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सजग आहे. कोकण किनारपट्टीवर एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन पूर्वतयारी केली जात आहे. समुद्रात गेलेल्या सर्व बोटी बंदरात परत बोलावून घेतल्या आहेत, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून दिली.
वाचा सविस्तर...चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सजग - महसूलमंत्री
मुंबई- महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर ३ जूनला निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्व उपाययोजना समन्वयाने करण्यात येत आहेत. मुंबईकर नागरिकांनी देखील आवश्यक ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे.