महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाची लस बनवायला लागणार वेळ, व्हायरोलॉजिस्टची माहिती - कोरोना वायरस के लक्षण

देशात सर्वत्र कोरोनाने थामान घातला आहे. याचा प्रसार थांबावा यासाठी टाळेबंदी करण्यात आली आहे. कोरोनाबाबत अनेकांच्या भीती आहे. याबाबत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या लखनऊच्या प्रतिनिधीने वरिष्ठ वायरोलॉजिस्ट डॉ. भावना जैन यांच्याशी बातचीत केली आहे.

बातचीत करताना
बातचीत करताना

By

Published : Apr 12, 2020, 2:07 PM IST

लखनऊ -कोरोना 'व्हायरस' हा शब्द सर्वांना ज्ञात आहे. पण, व्हायरस, इतका खतरनाक कसा, काय आहे या व्हायरसवर कोणती लस आहे का? अशा विविध प्रश्नांच्या उत्तराता शोध घेण्यासाठी ईटिव्ही भारतच्या टीम व्हायरस बाबत संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांकडे गेली. व्हायरसबाबत असणाऱ्या अभ्यासाला 'व्हायरोलॉजी' म्हणतात तर याचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांना 'व्हायरोलॉजिस्ट' म्हणतात. 'व्हायरस' आणि 'कोरोना व्हायरस' बाबत माहिती घेण्यासाठी ईटिव्ही भारतने वरिष्ठ व्हायरोलॉजिस्ट डॉ. भावना जैन यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या हा व्हायरस नवीन असून यावर लस तयार करण्यासाठी वेळ लागणार आहे.

कोरोनाची लस बनवायला लागणार वेळ, वायरोलॉजिस्टची माहिती

जीवित कोशिकांच्या संपर्कात आल्यानंतरच व्हायरस आपला प्रभाव दाखवतो

ईटिव्ही भारतशी बातचीत करताना वरिष्ठ वायरोलॉजिस्ट डॉ. भावना जैन म्हणाल्या, व्हायरसला सजीव आणि निर्जीवमधील दुवा म्हणातात. हे व्हायरस एखाद्या जीवित कोशितांच्या संपर्कात आल्याशिवाय आपला प्रकोप दाखवत नाही.

जानें क्या 'सिंप्टोमेटिक' और 'असिंप्टोमेटिक' व्हायरस

डॉ. भावना जैन म्हणाल्या, जर व्हायरसचा कोण्या व्यक्तीला संसर्ग झाला तर व्यक्तिच्या शरीरात काही परिवर्तन होतात. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसली तर त्या व्हायरसला 'सिंप्टोमॅटिक' व्हायरस म्हणतात. पण, जर शरीरात व्हायरसची कोणतीच लक्षणे दिसली नाही तर त्याला 'असिंप्टोमेटिक' व्हायरस म्हणतात. काही लोकांमध्ये 'रोग प्रतिकारक क्षमता' म्हणजेच 'इम्यूनिटी सिस्टम' जास्त असते. त्यामुळे व्हायरसचा परिणाम लवकर दिस नाही. यामुळे व्हायररलचा फैलाव जास्त होतो.

नव्या रूपाने समोर आला 'कोरोना व्हायरस'

डॉ. भावना जैन म्हणाल्या, व्हायरस खूप चालाख आहे. तो सतत आपले गुणधर्म बदलतो. यामुळे व्हायरसची प्रभावी लस लवकर तयार करत येत नाही. दर दो-तीन वर्षांनंतर कोणत्याही व्हायरसच्या लसमध्ये बदल केले जातात. डॉ. भावना जैन म्हणाल्या की, कोरोना हा नवीन व्हायरस नाही. पण, त्याच्या अनुवांशिक गुणांमध्ये खुप बदल झाला आहे. तो 'नोवेल कोरोना व्हायरस' हा नवा रुप आहे.

'नोवेल कोरोना व्हायरस' की लस तयार करण्यासाठी वेळ लागणार

डॉ. भावना जैन म्हणाल्या, हा व्हायरस नवीन आहे. त्यामुळे याबाबत कोणालाही संपूर्ण माहिती नाही. सध्या याबाबत वैज्ञानिक संशोधनात्मक माहिती गोळा करत आहेत. त्या पुढे म्हणाल्या, कोरोनाची लस तयार करण्यासाठी वेळ लागणार आहे. कारण, हा व्हायरस आमच्यासाठी नवीन आहे.

ईटिव्ही भारतचे आवाहन

कोरोना व्हायरसवर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. यामुळे आपल्याला सतर्कतेने या कोरोनाविरोधात लढाई लढावी लागणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात शासनाकडून करण्यात आलेल्या सर्व सुचनांचे पालन करा, स्वतः सुरक्षित रहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा, असे आवाहन ईटिव्ही भारत सर्वांना करत आहे.

हेही वाचा -परदेशी महिलेचा पोलिसांसोबत वाद, मास्क न बांधल्याने अडवले असता घडला प्रकार

ABOUT THE AUTHOR

...view details