महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top १० @ ९ AM : सकाळी ९ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर... - top news

सकाळी ९ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

etv-bharat-special-top-ten-news-stories-at-9-am
Top १० @ ९ AM : सकाळी ९ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या, एका क्लिकवर...

By

Published : Jun 10, 2020, 8:59 AM IST

मुंबई -दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील सुगो हेंढमा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले...औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात बहीण-भावाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे...कोरोनाबाबतच्या सर्व तक्रारींचे अथवा समस्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी एअर इंडिया कोविड-सेलची स्थापना करणार आहे... सतत टीव्हीवर कार्टून आणि चित्रपट पाहणाऱ्या तेरा वर्षीय मुलाला आईने टीव्ही पाहण्यास मज्जाव केल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...

  • श्रीनगर - दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील सुगो हेंढमा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवांद्यांना कंठस्नान घातले.

सविस्तर वाचा -J&K : शोपियान जिल्ह्यात लष्कर-दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ दहशतवाद्यांचा खात्मा

  • औरंगाबाद - शहरातील सातारा परिसरात बहीण-भावाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि. 9 जून) रात्री ही घटना उघडकीस आली. याबाबत सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा -धक्कादायक! औरंगाबादमध्ये बहीण-भावाची गळा चिरून निर्घृण हत्या

  • मुंबई -आपल्याकडे श्रमिक विशेष रेल्वेंच्या कोणत्याही मागण्या प्रलंबित नसल्याचा पुनरुच्चार राज्य सरकारने मंगळवारी केला होता. मात्र, एका कामगार संघटनेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये असे म्हटले आहे, की अजूनही कित्येक स्थलांतरित कामगार महाराष्ट्रामध्ये अडकले आहेत. यांमध्ये पश्चिम बंगालच्या बहुतांश कामगारांचा समावेश असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.

सविस्तर वाचा -'राज्यात अजूनही स्थलांतरित मजूर अडकलेत'; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल..

  • पुणे : सतत टीव्हीवर कार्टून आणि चित्रपट पाहणाऱ्या तेरा वर्षीय मुलाला आईने टीव्ही पाहण्यास मज्जाव केल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने उचललेल्या या पावलामुळे बिबवेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा -कार्टून पाहण्यास मज्जाव केल्याने १३ वर्षीय मुलाची आत्महत्या..

  • जळगाव- शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या आक्रमक भाषण शैलीमुळे 'खान्देशची मुलुख मैदान तोफ' म्हणून परिचित आहेत. मात्र, सध्या ते एका वेगळ्याच विषयावरून चर्चेत आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर या मंत्री महोदयांचा थाटच निराळा आहे. ते सध्या प्रत्येक कपड्यावर 'मॅचिंग मास्क' वापरत आहेत. गुलाबरावांचा हा थाट नामनिराळा ठरला आहे.

सविस्तर वाचा -मंत्री गुलाबराव पाटील सध्या 'या' कारणामुळे आहेत चर्चेत

  • नवी दिल्ली - कोरोनाबाबतच्या सर्व तक्रारींचे अथवा समस्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी एअर इंडिया कोविड-सेलची स्थापना करणार आहे. कंपनीचे चेअरमन राजीव बन्सल यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली.

सविस्तर वाचा -कोरोनाबाबतच्या समस्यांसाठी एअर इंडिया सुरू करणार 'कोविड-सेल'

  • भोपाळ - मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर 10 दिवस सुट्टीवर गेले आहेत. उत्तर प्रदेशातील लखनौ येथील आपल्या गावी ते आज (मंगळवार) गेले आहेत. मध्यप्रदेशात तीन राज्यसभा जागांसाठी 19 जूनला निवडणूक होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत

सविस्तर वाचा -मध्यप्रदेशचे राज्यपाल दहा दिवसांच्या सुट्टीवर; राज्यसभा निवडणुकीला परतणार माघारी

  • वॉशिंग्टन / मुंबई:ओव्हरसिज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्ड असलेल्या पाच भारतीय-अमेरिकन जोडप्यांच्या कुटुंबीयांसोबत मुंबई विमानतळावर गैरवर्तन करण्यात आले आहे. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चुकीचे वर्तन केल्याचे या कुटुंबीयांनी म्हटले आहे. भारतीय वंदे भारत मिशनमार्फत ही पाच जोडपी सोमवारी मुंबई विमानतळावर दाखल झाली होती.

सविस्तर वाचा -अमेरिकेतील ओसीआय कार्डधारकांसोबत मुंबई विमानतळावर गैरवर्तन, सात तास ठेवले बसवून

  • कोल्हापूर- जिल्ह्यात 'आरोग्य सेतू' या ॲपचा चांगलाच उपयोग होत असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापुरातील कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 596 जणांची माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाकडून या अ‌ॅपच्या माध्यमातून आरोग्याची काळजी घेण्याबाबतचे संदेश, संपर्कात आलेल्या व्यक्तींना पाठविण्यात आले असल्याची माहिती, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

सविस्तर वाचा -'आरोग्य सेतू’ ॲपमुळे समजले 596 कोल्हापूरकर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात; 'त्या' सर्वांना दक्षतेचे संदेश

  • नरखेड (नागपूर) : तालुक्यातील अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी तसेच वंचित बहुजन आघाडीने केली आहे. अरविंद बनसोड या तरुणानाने आत्महत्या केली नसून, त्याचा खून झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सविस्तर वाचा -अरविंद बनसोड मृत्यू प्रकरण : हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप; निष्पक्ष चौकशीची केली मागणी..

ABOUT THE AUTHOR

...view details