मुंबई -लोकल सेवा सुरु झाल्यास आम्हीही आमची सेवा देऊ, असे मुंबई डबेवाला असोसिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले आहे... कोरोना विषाणूच्या भीतीने गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे घरीच असलेल्या सैफ अली खान व करीना कपूरने मुलगा तैमूरसोबत मरीन ड्राइव्हवर फेरफटका मारला... खरीप हंगाम सुरू झाला, तरी राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून आहे. हा कापूस कधी विकला जाईल याच्या चिंतेत सध्या शेतकरी आहे. यासह देश, विदेशासह राज्यातील महत्वाच्या बातम्या...
- मुंबई - 'मिशन बिगिन अगेन'मध्ये मुंबई काही प्रमाणात सुरू झाली आहे. कार्यालय देखील उघडण्यात आली आहेत. लोकलसेवा सुरू न झाल्यामुळे मुंबईचा डब्बेवाला कर्मचाऱ्यांना सेवा देऊ शकणार नाही. काही जवळच्या ठिकाणी आम्ही योग्य सुरक्षा घेऊन डब्बे देण्याचा विचार करत आहोत. त्यामुळे लोकल सेवा सुरु झाल्यास आम्हीही आमची सेवा देऊ, असे मुंबई डबेवाला असोसिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.
सविस्तर वाचा -लोकलसेवा सुरू झाल्यास आम्हीही सेवा देऊ - मुंबई डबेवाला असोसिएशन
- मुंबई - कोरोना विषाणूच्या भीतीने गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे घरीच असलेल्या सैफ अली खान व करीना कपूरने मुलगा तैमूरसोबत रविवारी मरीन ड्राइव्हवर फेरफटका मारला. ते समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्ताचा आनंद घेत असताना, पोलिसांनी त्यांना हटकले. तेव्हा त्यांना घरी परतावे लागले.
सविस्तर वाचा -सैफ-करीनाचा तैमुरसोबत मरीन ड्राइव्हवर फेरफटका; पोलिसांनी हटकले तेव्हा घेतला काढता पाय
- मुंबई- एका महिलेला प्रसव वेदना सुरु होत होत्या. मात्र तीला ताप असल्याने कोरोनाच्या भीतीमुळे पालिका किंवा खासगी रुग्णालये तिला दाखल करून घेण्यास नकार देतात. त्याचवेळी एक क्लिनिक चालवणारा डॉक्टर मदतीला धावत येतो आणि त्या महिलेची प्रसूती घरातच करतो. एखाद्या चित्रपटामधील हा प्रसंग वाटत असला तरी असाच प्रसंग देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चांदीवली येथे घडला आहे. यामुळे वेळ प्रसंगी मदतीला धावून येणाऱ्या डॉ. रविंद्र म्हस्के यांचे सर्वत्र कौतूक होत आहे
सविस्तर वाचा -मुंबई : शासकीय रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास नकार दिल्याने महिलेची घरातच झाली प्रसुती
- मुंबई - भारताची चीनसोबत सुरू असलेली चर्चा ही सकारात्मकरित्या पुढे जात असून, आपण ती सुरू ठेवणार असल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या व्हर्च्युअल जन-संवाद रॅलीमध्ये ते बोलत होते.
सविस्तर वाचा -'सीमाप्रश्नाबाबत चीनसोबत सुरू असलेली चर्चा सकारात्मक'
- कॅरी (अमेरिका) -कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या अन्यायकारक मृत्यूनंतर अमेरिकेमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. कॅरी शहरातील उत्तर कॅरोलिना भागात ख्रिश्चन धर्मगुरुंच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना आणि पदयात्रा काढली होती. पदयात्रेच्या समारोपावेळी संबंधीत भागातील पोलिसांनी आंदोलक आणि ख्रिश्चन धर्मगुरूंचे पाय धुवून नमस्कार केला. या प्रसंगाला कॅरीचे हंगामी महापौर लोरी बुश यांनी ट्वीट करून दुजोरा दिला आहे. हा एक मार्मिक क्षण असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.