महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - important happening in India

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी...

etv bharat special top ten news stories at 9 am
Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

By

Published : Jun 8, 2020, 9:06 AM IST

मुंबई -काश्मीरच्याशोपीयानमधील पिंजोरा गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक उडाली. यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले...राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अटींसह दुकाने, रिक्षा, टॅक्सी तसेच अन्य व्यवहार सुरू झाल्यानंतर आजपासून (दि. 8 जून) खासगी कार्यालये सुरू होत आहेत...प्रवचनकार मोरारी बापू यांच्या विरोधात श्रीकृष्णाबाबत अपशब्द वापरल्यामुळे कालवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...सचिन तेंडुलकर याला १०० वे शतक करण्यास रोखल्याने, मला आणि पंच रुड टकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, असा दावा इंग्लंडचा गोलंदाज टिम ब्रेसनन याने केला आहे. यासह टॉप-१० बातम्या...

  • श्रीनगर- शोपीयानमधील पिंजोरा गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक उडाली. यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. या बाबतची माहिती जम्मू कश्मीर पोलीसांनी दिली आहे.

सविस्तर वाचा - जम्मू-काश्मीर; शोपीयानमध्ये सुरक्षा दलाने केला 4 दहशतवाद्यांचा खात्मा

  • मुंबई- राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अटींसह दुकाने, रिक्षा, टॅक्सी तसेच अन्य व्यवहार सुरू झाल्यानंतर आजपासून (दि. 8 जून) खासगी कार्यालये सुरू होत आहेत. कार्यालयांमध्ये एकूण क्षमतेच्या १० टक्के कर्मचाऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केल्याने शासकीय कार्यालयांमधील लगबग वाढणार आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास गती मिळणार आहे.


सविस्तर वाचा -आजपासून राज्यात सुरू होणार खासगी कार्यालये 'या आहेत अटी'

  • जयपूर (राजस्थान) - प्रवचनकार मोरारी बापू यांच्या विरोधात श्रीकृष्णाबाबत अपशब्द वापरल्यामुळे कालवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर यांच्या एका प्रवचनाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी श्रीकृष्ण त्यांचे वडीलबंधू बलदेवांवर टिका केली होती.

सविस्तर वाचा -श्रीकृष्णाबाबत अपशब्द वापरणाऱ्या प्रवचनकार मोरारी बापूंविरोधात गुन्हा दाखल

  • मुंबई- सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याने आज मातोश्रीवर जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती.

सविस्तर वाचा -. . अखेर सोनू सूद मातोश्रीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेतली भेट

  • दंतेवाडा- छत्तीसगडच्या दंतेवाडा हा परिसर नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. याच परिसरात नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेल्या बस्तर येथील एका महिला कमांडोने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सुनैना पटेल असे या कमांडो महिलेचे नाव आहे. ७ महिन्यांची गर्भवती असतानाही त्यांनी नक्षलविरोधी मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांच्या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतूक झाले होते.

सविस्तर वाचा -सात महिन्यांची गर्भवती कमांडो देत होती नक्षलविरोधी लढा, गोंडस मुलीला दिला जन्म

चंद्रपूर- पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना पोंभुर्णा तालुक्यातील भटारी या गावात घडली. कार्तिक मारोती कोवे असे मृत मुलाचे नाव आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.


सविस्तर वाचा -पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू; पोंभुर्णा येथील घटना

अमरावती- कामगाराने वेतन न मिळाल्याचा आरोप करत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विकास दिंडेकर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कामगाराचे नाव आहे. तो डीगरगव्हाण येथील रहिवासी आहे. त्याच्यावर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विकास दिंडेकर हा गेल्या अनेक वर्षापासून रतन इंडियामधील एमबीपीएल या कंपनीत काम करतो. कोरोनाचे कारण देत कंपनीने मागील तीन महिन्यापासून वेतन न दिल्याने शेकडो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.


सविस्तर वाचा -कंपनीने तीन महिन्याचे वेतन न दिल्याचा आरोप करत कामगाराचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न...

  • मुंबई- सचिन तेंडुलकर याला १०० वे शतक करण्यास रोखल्याने, मला आणि पंच रुड टकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, असा दावा इंग्लंडचा गोलंदाज टिम ब्रेसनन याने केला आहे. ब्रेसनन याने 'यॉर्कशर क्रिकेट कवर्स ऑफ पॉडकास्ट'मध्ये बोलताना हा दावा केला.

सविस्तर वाचा -सचिनला बाद केल्याने, मला आणि पंचांना मिळाली जीवे मारण्याची धमकी, इंग्लंड गोलंदाजाचा दावा

  • मुंबई- लॉकडाऊनच्या काळात सर्व खेळाडू आपापल्या घरी कुटूंबियासोबत वेळ घालवत आहेत. अशात अनेक खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. रोहित शर्माही या काळात सोशल मीडियावर अ‌ॅक्टिव्ह आहे. त्याने काही तासांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो मुलगी समायरासोबत खेळताना दिसत आहे.

सविस्तर वाचा -Video : लॉकडाऊनमध्ये लाडक्या समायरासोबत रोहित शर्माची धमाल मस्ती

  • मुंबई- अभिनेत्री सुष्मिता सेनने ‘आर्या’ या तिच्या पहिल्या वेबसीरिजमधून पडद्यावर कमबॅक केलं आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला केवळ एका दिवसात 10 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासाठी सुष्मिताने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

सविस्तर वाचा -'आर्या'च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती, सुष्मिता सेननं मानले चाहत्यांचे आभार

ABOUT THE AUTHOR

...view details