मुंबई - मागासवर्गीय तरुणांच्या हत्यांवरून राज्यभर क्षोभ वाढत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. राज्यात कोणत्याही परिस्थितीत मागास समाजावर होणारे अन्याय, अत्याचार सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन पीडितांच्या पाठीशी असून या प्रकारच्या गुन्ह्यांतील दोषींविरुद्ध तात्काळ व कडक कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
वाचा सविस्तर -'मागासवर्गीयांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत'; दोषींविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश
मुंबई - आपल्याला काळजी घेऊन सांभाळून पुढे पाऊल टाकायचं आहे. कुठेही घाई न करता सरकार सुद्धा सावधगिरीने पावले उचलत आहे. जसे टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन लावले तसेच टप्प्याटप्प्याने जीवन पूर्वपदावर आणले जात आहे. मात्र, संकट टळलेले नाही. कोरोनाविरुद्धचा लढा अद्यापही सुरूच आहे. सरकार परिस्थितीचा अंदाज घेत आहे. लॉकडाऊनमध्ये दिलेली सूट जीवघेणी ठरू लागली, तर नाईलाजाने परत लॉकडाऊन वाढवावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
वाचा सविस्तर- ...तर राज्यात परत लॉकडाऊन - मुख्यमंत्री
मुंबई - राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन कोरोनाच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. आता हे अधिवेशन कोरोनाची परिस्थिती पाहून 3 ऑगस्टला होईल, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोकणाला विशेष पॅकेज देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. उद्यापासून २ दिवसांच्या कोकण दौऱ्यावर जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
वाचा सविस्तर -विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टला घेण्यास पाठिंबा - देवेंद्र फडणवीस
पुणे- डॉलरच्या बदल्यात बनावट नोटा देणाऱ्या तस्करांच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या तस्करांकडून ७ कोटी ६० लाखाच्या बनावट तर २ लाख ८० हजाराची रोख रक्कम जप्त केली. खंडणी विभाग आणि लष्कर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.
वाचा सविस्तर -डॉलरच्या बदल्यात बनावट नोटा.. ७ कोटी ६० लाखाच्या बनावट नोटांसह पावणे तीन लाखांची रोखड जप्त
अहमदनगर- कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन सतर्क आहेत. हे संकट अजून संपलेले नाही. लॉकडाऊननंतरच्या काळात सर्व व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शासन काम करत आहे. लॉकडाऊनमधील शिथिलता ही पूर्णपणे मोकळीक नसून कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने स्व:तची काळजी घेत स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
वाचा सविस्तर -कोरोना संकट संपलेले नसून ते टाळण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी - बाळासाहेब थोरात
गांधीनगर - अनेक राजकीय नेते राज्य सरकारने दिलेल्या सुविधांचा भरणा भरत नसल्याचे अनेक उदाहरणे पाहिली आहेत. गुजरात राज्य सरकारच्या आंबेडकर अंत्योदय विकास महामंडळाच्या अध्यक्षांनी आपल्या कारचे पेट्रोल बिल दोन लाख रुपये भरलेच नाही. दरम्यान, डिफॉल्टनंतर गांधीनगरच्या सेक्टर २१ मधील पेट्रोल पंप व्यवस्थापकाने अशा अनेक राजकारण्यांची ब्लॅकलिस्ट तयार केली असून, त्या सर्वांचे नावे आणि त्यांच्या कारचा क्रमांक पेट्रोल पंपावर लावला आहे. तसेच अशा लोकांना पेट्रोल न देण्याच्या सूचना पंपावरील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
वाचा सविस्तर -बिल न भरल्याने दोन महामंडळाच्या अध्यक्षांच्या वाहनात पेट्रोल भरण्यास मनाई; पंपावर लावले गाड्यांचे नंबर
कोल्हापूर - केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र सरकारवर आरोप करत महाराष्ट्र सरकार म्हणजे सर्कस असल्याची उपहासात्मक टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमच्याकडे सर्कस आहे, त्यामध्ये प्राणी आहेत, मात्र विदूषक नसल्याची खोचक टीका केली होती. याचाच समाचार आज चंद्रकांत पाटील यांनी घेतला. ते म्हणाले, शरद पवार यांनी त्यांच्याकडे सर्कस आहे आणि त्यामध्ये प्राणी आहेत हे मान्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्कस सुरू आहे हे पवारांनीच म्हटले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
वाचा सविस्तर -'शरद पवारांनीच मान्य केले, महाराष्ट्रात सर्कस सुरू आहे'
धुळे - विकास बँकेने ॲक्सिस बँकेत सुमारे 2 कोटी 6 लाख 50 हजारांची रक्कम ठेवले होती. ही रक्कम अज्ञातांनी बँकेची सिस्टीम हॅक करून लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिस्टिम हॅक करून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम लांबवल्याची धुळे शहरातील ही पहिलीच घटना आहे.
वाचा सविस्तर -ॲक्सिस बँकेची सिस्टीम हॅक तब्बल 2 कोटी 6 लाख रुपये लांबवले, धुळ्यातील घटना
मुंबई -बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी मुंबईत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना माघारी पाठवण्यासाठी तीन चार्टर्ड विमानांची व्यवस्था केल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर वाचा -'बिग-बी'च धावले परप्रांतीय कामगारांच्या मदतीला; तीन चार्टड विमानांची व्यवस्था
जळगाव -शहरातील काेविड रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असल्याने उपचार घेत असलेली एक ८२ वर्षीय वृद्ध महिला ५ जूनपासून बेपत्ता झाली होती. या बेपत्ता वृद्धेचा मृतदेह बुधवारी सकाळी कोविड रुग्णालयातील ७ क्रमांकाच्या वॉर्डातील शौचालयात आढळून आला. ५ दिवस हा मृतदेह शौचालयात पडून होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सविस्तर वाचा - खळबळजनक..! कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह आढळला रुग्णालयाच्या शौचालयात, ५ दिवसांपासून होती बेपत्ता