मुंबई - जगातीलकोरोना रुग्णांचा आकडा 70 लाख 80 हजारावर पोहोचला आहे...'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत राज्य शासनाने व मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार आजपासून (दि. 8 जून) मुंबईच्या बेस्ट बसमध्ये आता सामान्य नागरिकांनाही प्रवासाची मुभा देण्यात आली आहे... भारतातील प्रमुख मोठ्या देवस्थानांपैकी एक असलेले बालाजी मंदिर पुन्हा भक्तांना दर्शनासाठी उघडण्यात आले आहे. यासह अकरा वाजेपर्यंतच्या मोठ्या बातम्या, वाचा सविस्तर...
- हैदराबाद -कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जगभरामध्ये आतापर्यंत 70 लाख 80 हजार 811 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 4 लाख 5 हजार 74 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 34 लाख 55 हजार 104 जण कोरोनामुक्त झाले आहेत. न्यूझीलंड हा देश कोरोनामुक्त झाल्याची माहिती तेथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.
सविस्तर वाचा -Global COVID-19 Tracker: जगभरात कोरोनाबधितांची संख्या 70 लाखांवर तर न्यूझीलंड झाले कोरोनामुक्त
- मुंबई - 'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत राज्य शासनाने व मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार आजपासून (दि. 8 जून) मुंबईच्या बेस्ट बसमध्ये आता सामान्य नागरिकांनाही प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. बेस्ट प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोरेगाव बस डेपोतून ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा.
सविस्तर वाचा -आजपासून सामान्य प्रवाशांसाठी 'बेस्ट' बससेवा सुरु, मुंबईकरांना दिलासा
- तिरुमला- भारतातील प्रमुख मोठ्या देवस्थानांपैकी एक असलेले बालाजी मंदिर पुन्हा भक्तांना दर्शनासाठी उघडण्यात आले आहे. मागील ७० दिवसाहून अधिक काळानंतर हे मंदिर भक्तासाठी खुले करण्यात आले आहे. पण भक्तांना दर्शनासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहेत.
सविस्तर वाचा -भक्तांसाठी तिरुपती बालाजी मंदिर उघडले, दर्शनासाठी 'या' आहेत अटी
- अलवर- देशात सध्या कोरोना महामारी वेगाने पसरत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या पार्दुभावापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सर्वच स्तरातून करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने फिजिकल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थानच्या अलवर येथील एका १५ वर्षीय मुलाने फिजिकल डिस्टन्सिंग ठेवता येईल अशी एक टोपी आणि हात धुण्याची निर्धारित वेळ सांगणार रोबोट तयार केला आहे.
सविस्तर वाचा -कोरोनाशी लढा... फिजिकल डिस्टेन्सिंग ठेवायला सांगतोय अलवरच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा रोबो
- श्रीनगर- शोपीयानमधील पिंजोरा गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक उडाली. यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. या बाबतची माहिती जम्मू कश्मीर पोलीसांनी दिली आहे.