महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या.. - चारच्या बातम्या

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

top ten news stories at four PM
Top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या..

By

Published : May 8, 2020, 4:26 PM IST

  • मुंबई - कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठाच्या परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा होणार आहेत, तर प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा -महाविद्यालयीन परीक्षांबाबत मोठा निर्णय, फक्त अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होणार

  • मुंबई- येणाऱ्या 21 मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले आहे. प्रविण दटके,गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा -विधानपरिषद निवडणूक : भाजपचा खडसे, पंकजा मुंडे, बावनकुळेंना धक्का, नव्या चेहऱ्यांना संधी

  • नवी दिल्ली - कोरोना विषाणूची लढाई लढताना केंद्र सरकारने आपल्या कृतीमध्ये पारदर्शकता आणणे गरजेचे आहे. याबाबत कुठलेही निर्णय घेताना त्यात सर्व राज्य सरकारला सहभागी करायला पाहिजे. कोरोनाशी लढताना सत्तेचे विकेंद्रीकरण करून राज्य सरकार आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवावा. आपण फक्त पंतप्रधान स्थरावरून ही लढाई लढली तर हरल्याशिवाय राहणार नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. आज त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

सविस्तर वाचा -केंद्राने कोरोनाशी लढताना राज्य सरकारला विश्वासात घेणे गरजेचे - राहुल गांधी

  • अमरावती - कोविड रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर अतिदक्षता विभागात रात्री 8 ते 2 वाजेपर्यंत माझी ड्युटी होती. रात्रीची ड्युटी म्हणजे झोपेला मारणारी ड्युटी. त्या दहा दिवसात मी झोपलीच नाही. इतर कुठल्याही गोष्टीला मुभा नव्हती. अतिदक्षता विभागात असल्यामुळे कोरोना रुग्णांना किती यातना होतात, हे डोळ्यादेखत अनुभवले, असे तब्बल २८ दिवसांनी घरी परतलेल्या परिचारिका सुनीती यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - 'कोरोना रुग्णांच्या यातना डोळ्यानं पाहिल्या, ड्युटीच्या १४ दिवसांत मी झोपलेच नाही'

  • गोंदिया - जिल्ह्यातील गोरेगाव आणि तिरोडा या दोन तालुक्यात मागील दोन महिन्यामध्ये एका नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला होता. मोह फुले वेचण्यासाठी गेलेल्या एका महिला आणि पुरुषाला या वाघिणीने ठार केले होते. या वाघिणीचा वाढता धुमाकुळ लक्षात घेता तिला जेरबंद करण्याचे आदेश देण्यात वनविभागाकडून देण्यात आले होते.

सविस्तर वाचा -गोंदियातील नरभक्षक एन-वन वाघिण अखेर जेरबंद

  • नवी दिल्ली - कोरोनामुळे भारताचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानीला चीन जबाबदार असून भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात चीनकडे ६०० अब्ज डॉलरची नुकसानभरपाई मागावी, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला यासंबधी निर्देश द्यावे असेही याचिकेत म्हटले आहे.

सविस्तर वाचा -कोरोना संकट: 'चीनकडे ६०० अब्ज डॉलर नुकसान भरपाईचा दावा करा'

  • लखनऊ - उत्तर प्रदेशच्या महासी विधानसभेतील भाजप आमदार सुरेश्वर सिंह यांनी गोहत्येसंदर्भात गंभीर आरोप केला आहे. लॉकडाऊनदरम्यान बहरीच जिल्ह्यामधील गोहत्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.

सविस्तर वाचा -लॉकडाऊनमध्ये बहरीचमधील गोहत्या वाढल्या; भाजप नेत्याचा आरोप..

  • हैदराबाद - जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ विषाणु मद्य सेवन करणाऱ्यांच्या शरिरात झपाट्याने पसरत असल्याने दारूची सवय सोडा, असा इशारा दिला आहे. तसेच मद्यग्राहक झिंगलेल्या अवस्थेत असताना त्याच्या वर्तनामुळे सोसायटीत विषाणुचा सहज प्रसार करण्यास कारण ठरू शकतो, असेही उघड झाले आहे.

सविस्तर वाचा -दारू पिणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा!

  • लंडन- फ्रेंच शहर रीम्समध्ये जर्मन जनरल अल्फ्रेड जोडलने आत्मसमर्पण केल्याची बातमी जगभर पसरली तेव्हा न्यूयॉर्क ते लंडन, पॅरिस आणि मॉस्को पर्यंत उत्सव साजरे झाले. 8 मे 1945 रोजी युरोपमधील दुसरे महायुद्ध संपुष्टात आले.

सविस्तर वाचा -दुसऱ्या महायुद्धाची पंच्चाहत्तरी पूर्ण..

  • वॉशिंग्टन -हॉलिवूड स्टार टॉम क्रूझ आपला आगामी सायन्स फिक्शन चित्रपट अंतराळात शूट करणार आहे. याच्या काही बातम्या यापूर्वी प्रसिध्द झाल्या होत्या. आता या गोष्टीला नासाने संमती दिल्यामुळे टॉम क्रूझचा उत्साह वाढला आहे.

सविस्तर वाचा -टॉम क्रूझच्या आगामी सिनेमाचे शूटिंग होणार अंतराळात, नासाने दिला दुजोरा

ABOUT THE AUTHOR

...view details