महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकराच्या ठळक बातम्या - breaking news in marathi

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

etv-bharat-maharashtra-top-ten-news-stories-at-4-pm
Top 10 @ 11 PM : रात्री अकराच्या ठळक बातम्या

By

Published : Jun 11, 2020, 1:10 PM IST

Updated : Jun 11, 2020, 11:00 PM IST

नवी दिल्ली -चीन- भारत सीमा वाद आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात स्वदेशीचे वारे वाहू लागले आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी सर्व स्तरांवरून होत आहे. दरम्यान, ‘द कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (CAIT) या संघटनेकडून ‘इंडियन गुड्स आवर प्राईड’ हे अभियान सुरु केले आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशी वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा -चिनी वस्तूंवर बहिष्कारासाठी CAIT चे अभियान सुरू; स्वदेशी बनावटीच्या मास्क आणि ग्लासचे अनावरण

चेन्नई- तामिळनाडू राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवविवाहीत जोडप्याची मधुचंद्राची पहिली रात्रच शेवटची ठरली. विवाह झाल्यानंतर पहिल्याच रात्री पतीने आपल्या पत्नीचा खून केला अन् नंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना काल (बुधवारी) चेन्नईजवळील मिंजूर येथे घडली.

सविस्तर वाचा -असं काय घडलं....लग्नाच्या पहिल्याच रात्री बायकोचा केला खून, नंतर स्वत:ही घेतली फाशी

मुंबई- राज्यात आज १५६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ७८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३६०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४७ हजार ९६८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सविस्तर वाचा -'कोरोना निदानाच्या ९५ प्रयोगशाळा कार्यरत, राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४७.२ टक्के'

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सविस्तर वाचा -'आठवड्यात मुंबईमध्ये नव्याने ५०० आयसीयू बेड उपलब्ध होणार'

रायगड - महाविकास आघाडी सरकारने निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून यामध्ये छोटे व्यापारी, बागायतदार, नुकसानग्रस्त यांच्या हाताशी काहीच लागणार नाही. चक्रीवादळ होऊन 9 दिवस झाले. तरिही जाहीर केलेल्या तातडीच्या मदतीचा एकही रुपया नागरिकांपर्यंत अद्याप पोहोचला नाही. तसेच नुकसानग्रस्त नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यातही प्रशासन आणि शासन अपुरे पडले आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सविस्तर वाचा -महाविकास आघाडी सरकारने कोकणसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी - देवेंद्र फडणवीस

मुंबई - मान्सून योग्य दिशेने वाटचाल करत असून 10 जूनला तो ईशान्य भारतात पोहचला आहे. आज गुरुवारी 11 जूनला मान्सूनच्या उत्तरेकडील सीमेचा पश्चिम भाग कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशला पार करून तेलंगणातील अनेक ठिकाणी पोहोचला. याच प्रगतीमुळे मान्सून गोवा, दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण उडिशा येथे पोहचला आहे, अशी माहिती स्कायमेट या खासगी हवामान विषयक संस्थेनं दिली आहे.

सविस्तर वाचा -मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने; मध्य भारतात प्रगती, उद्या मुंबईत आगमनाची शक्यता

औरंगाबाद - आजकाल सोशल मीडियावर खासगी गोष्टी टाकणे ही नेहमीचीच बाब झाली आहे. त्यात आपल्याकडे असलेल्या काही गोष्टींचे प्रदर्शन करणे अनेक वेळा अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. पोलीस आणि सायबर एक्स्पर्ट नेहमी याबाबत आवाहन करूनही आजही अनेक लोक सोशल मीडियावर आपल्या खासगी गोष्टी टाकण्यात धन्यता मानतात. त्यामुळे अशा गोष्टी आपल्या किंवा आपल्या कुटुंबीयांच्या जीवावर बेततात, अशीच एक घटना औरंगाबादेत उघडकीस आली.

सविस्तर वाचा -सावधान...! सोशल मीडियावर खासगी गोष्टी टाकणं ठरेल घातक

मुंबई - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ क्वारंटाईन सेंटरमधील आहे. त्या क्वारंटाईन सेंटरमधील लोकं चक्क क्रिकेट सामना खेळताना दिसत आहेत. यावर ओमर अब्दुल्ला यांनी मजेशीर रिअ‌ॅक्शन दिली आहे.

सविस्तर वाचा -चक्क क्वारंटाईन सेंटरमध्ये रंगला क्रिकेटचा सामना; माजी मुख्यमंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

मुंबई- आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन, याच वर्षात करण्यासाठी, बीसीसीआयकडून सर्व प्रकारच्या पर्यायांची चाचपणी सुरू आहे. जरी प्रेक्षकांविना सामने खेळवण्याची वेळ आली तरीही चालेल. बीसीसीआयकडून आयपीएलच्या आयोजनासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी एएनआयशी बोलताना सांगितले.

सविस्तर वाचा -'IPL आयोजनाबाबत सर्व पर्यायांची चाचपणी सुरू, वेळ पडली तर प्रेक्षकांविना सामने खेळवू'

मुंबई- लॉकडाऊनमध्ये अभिनेता सोनू सूदने अनेक कामगारांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मदत केली. याच कारणामुळे अभिनेता अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अशात आता सोनूने उत्तर प्रदेशातील आणखी एका गरजूला मदत केली आहे. या व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे, तिच्या अंत्यसंस्कारासासाठी या व्यक्तीला वाराणसी येथे जायचे होते.

सविस्तर वाचा -सोनू सूदची आणखी एका गरजूला मदत, पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी पाठवले वाराणसीत

Last Updated : Jun 11, 2020, 11:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details