मुंबई -मागील २४ तासांमध्येदेशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत तब्बल 9 हजार 996 इतकी भर पडली आहे. तसेच गेल्या 24 तासात 357 जणांचा मृत्यू झाला आहे....सलग पाचव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या कोकण दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ही रायगड दौऱ्यावर पोहोचले आहेत. त्यांनी अलिबाग तालुक्यातील नागाव, बागमळा, चौल या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 357 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 9 हजार 996 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात सध्या 2 लाख 86 हजार 579 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 1 लाख 41 हजार 29 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 37 हजार 488 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 8 हजार 102 जणांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा -देशात कोरोनाबाधितांची रेकॉर्डब्रेक वाढ, 24 तासात 9 हजार 996 नवे रुग्ण
- नवी दिल्ली - सलग पाचव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 60 पैशांची वाढ झाली आहे. तब्बल ८३ दिवसांनंतर रविवारी प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.
सविस्तर वाचा -इंधन दरवाढ सुरुच; सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात 60 पैशांची वाढ
- रायगड -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या कोकण दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ही रायगड दौऱ्यावर पोहोचले आहेत. त्यांनी अलिबाग तालुक्यातील नागाव, बागमळा, चौल या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर त्यांनी निरुपणाकर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली.
सविस्तर वाचा -देवेंद्र फडणवीस कोकण पट्ट्यात; 'निसर्ग'मुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
- गोंदिया- जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी वाढताना दिसत आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठी व तहसीलदारांच्या वाहनावर दगडफेक झाल्याची घटना गुरुवार (दि. 11 जून) तेढवा येथील घाटावर घडली आहे.
सविस्तर वाचा -गोंदियात : तलाठी-तहसीलदारांच्या वाहनावर वाळू तस्करांची दगडफेक
- पुणे - लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि पुणे पोलिसांच्या पथकाने पुण्यातील विमानतळ परिसरात बनावट नोटांचा साठा करणाऱ्या टोळीला जेरबंद केले. यावेळी पोलिसांनी एका लष्करी जवानासह सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत 44 कोटी बनावट भारतीय चलन आणि 4 कोटी 20 लाख रुपये विदेशी बनावटीचे चलन जप्त करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी शेख अलीम गुलाब खान, सुनील भद्रीनाथ सारडा, रितेश रत्नाकर, तोफिल अहमद मोहमद इसाक खान, अब्दुल गणी रेहमतुल्ला खान, अब्दुल रहमान अब्दुल गणी खान यांना ताब्यात घेतले आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.