- नवी दिल्ली- सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या रखडलेल्या परीक्षा आता जुलैमध्ये होणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याबाबत माहिती जाहीर केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
सविस्तर वाचा -सीबीएसई बोर्डच्या रखडलेल्या परीक्षा जुलैमध्ये होणार..
- नागपूर -महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे नेहमीच गरम असते. मग ते राज्यस्तरीय राजकारण असे अथवा पक्षीय राजकारण, नेहमीच काही ना काही घडामोडी घडत असतात. सध्या राज्यात आता विधान परिषदेच्या काही जागांसाठी निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठी चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
सविस्तर वाचा -अनेक दिग्गजांना मागे टाकत भाजपच्या 'या' नेत्याने पटकावली विधान परिषदेची उमेदवारी
- नवी दिल्ली - बाबरी प्रकरणाची अंतिम सुनावणी ३१ ऑगस्टच्या आतच पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. बाबरी मशीद पाडण्याप्रकरणी सीबीआयच्या कोर्टात सुनावणी सुरू आहे, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.
सविस्तर वाचा -३१ ऑगस्टच्या आत लागणार 'बाबरी'चा निकाल!
- जळगाव -गेली 40-42 वर्ष मी भाजपसाठी काम करत आहे. पक्षवाढीसाठी निरपेक्षपणे काम केले. त्यामुळे साहजिकच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा होती. परंतु, पक्षाने संधी दिली नाही. याची खंत आहे. ज्यांनी भाजपला शिव्या घातल्या. 'मोदी गो बॅक', असा ज्यांचा नारा होता, अशा राष्ट्रवादीतून आलेल्या लोकांना भाजपने उमेदवारी दिली.
सविस्तर वाचा -'ज्यांनी शिव्या घातल्या त्यांनाच भाजपने संधी दिली, पक्षाविषयी चिंतन करण्याची गरज'
- मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेवर नेमणूक करावी म्हणून राज्य मंत्रिमंडळाकडून आलेल्या शिफारशीवर अद्यापही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. याविषयी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली.
सविस्तर वाचा -मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषद नियुक्तीसंदर्भात राज्यपालांना उच्च न्यायालयाचे समन्स
- मुंबई -राज्यात 21 मे रोजी विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार असून संख्याबळानुसार काँग्रेस केवळ एका जागेवर विजय मिळवू शकतो. मात्र, या एका जागेसाठी पक्षातले 123 जण इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. परिषदेची निवडणूक एप्रिलच्या महिना अखेरीला गृहीत धरून पक्षाने इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते.